ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Milind Soman | मिलिंद सोमण यांच्या अडचणीत वाढ; न्यूड फोटोशूटप्रकरणी गोव्यात गुन्हा दाखल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 07, 2020 09:39 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Milind Soman | मिलिंद सोमण यांच्या अडचणीत वाढ; न्यूड फोटोशूटप्रकरणी गोव्यात गुन्हा दाखल

शहर : aldona

गोव्याच्या बीचवर अश्लील व्हिडीओ चित्रीकरण केल्याने अभिनेत्री, मॉडल पूनम पांडेला अटक झाल्याची घटना ताजी असतानाच गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर न्यूड फोटोशूट केल्याप्रकरणी अभिनेता मिलिंद सोमण अडचणीत आले आहेत. टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार या फोटोशूटमुळे त्यांच्याविरोधात गोव्यातील वास्को पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. मिलिंद सोमण यांनी गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर न्यूड होऊन पळतानाचा एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला होता. सोमण यांच्या याच फोटोशूटवर गोवा सुरक्षा मंचने आक्षेप नोंदवत त्यांच्याविरोधात तक्रार नोंंदवली आहे.

मिलिंद सोमण 4 नोव्हेंबरला आपल्या पत्नीसोबत गोव्यात गेले होते. त्यावेळी मिलिंद यांनी समुद्र किनाऱ्यावर न्यूड फोटोशूट केला. तसेच स्वत:चा न्यूड फोटो आपल्या इन्टाग्राम अकाऊंटर पोस्ट करत फोटोला ‘हॅपी बर्थडे टू मी असं कॅप्शन दिलं. त्यानंतर मिलींद यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

मिलींद यांच्या या फोटोवर गोव्यातील स्थानिक राजकीय पक्ष गोवा सुरक्षा मंचने आक्षेप नोंदवला आहे. या पक्षाने मिलिंद सोमण यांच्याविरोधात वास्को पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावेळी गोवा सुरक्षा मंचने ‘सोमण यांनी न्यूड फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्यामुळे गोव्याची प्रतिमा आणि संस्कृतीचा अपमान होत असल्याचं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

                      

दरम्यान, गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर न्यूड फोटोशूट केल्यामुळे सोमण यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याआधी अभिनेत्री पूनम पांडे विरोधातही गोव्याच्या समुद्र किनारी आक्षेपार्ह व्हिडीओचे चित्रण केल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे. पूनम पांडे (Poonam Pandey) आणि तिचा नवरा सॅम बॉम्बे (Sam Bomabay) यांना कॅनकोना येथून गुरुवारी ( 5 नोव्हेंबर) अटक करण्यात आली होती.

मागे

Payal Ghosh | ‘मी अजूनही न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत’, पायल घोषचे पुन्हा पंतप्रधान मोदींना साकडे!
Payal Ghosh | ‘मी अजूनही न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत’, पायल घोषचे पुन्हा पंतप्रधान मोदींना साकडे!

चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर (Anurag Kashyap) बलात्काराचा आरोप करणार्‍या अभिने....

अधिक वाचा

पुढे  

Tanushree Dutta | नाना पाटेकरांच्या बॉलिवूड पुनरागमनवर तनुश्री दत्ताचा संताप, म्हणाली...
Tanushree Dutta | नाना पाटेकरांच्या बॉलिवूड पुनरागमनवर तनुश्री दत्ताचा संताप, म्हणाली...

अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर 2018 मध्ये ‘Me Too’ चळवळींतर....

Read more