By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 04, 2020 11:17 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अभिनेता सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली नसून हे आत्महत्येचं प्रकरण आहे, असा अहवाल एम्सच्या डॉक्टरांनी सीबीआयला सोपवला आहे. त्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया आली आहे. सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूचा चौकशी अहवाल सीबीआयने लवकरच जाहीर करावा. जेणेकरुन हे प्रकरण आत्महत्येचं आहे की हत्येचं हे सर्वांना कळू शकेल, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं.
महाराष्ट्र सरकार या प्रकरणातील सीबीआय चौकशी अहवालाची प्रतीक्षा करत आहे. आम्हाला त्यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. जोपर्यंत आम्हाला अधिकृत माहिती मिळत नाही तोपर्यंत त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. आम्हाला याविषयी अधिकृत माहिती मिळेल तेव्हा यावर भाष्य करु. मात्र या प्रकरणातील सीबीआय चौकशी अहवाल लवकरच लोकांसमोर यावा, जेणेकरून ही हत्या आहे की आत्महत्या कळलं पाहिजे.
सीबीआयने अंतिम अहवाल दिलेला नाही- भाजप आमदार राम कदम
अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांची हत्या की आत्महत्या याचा रिपोर्ट जरी आला असला तरी यावर सीबीआयने अंतिम अहवाल दिलेला नाही. सीबीआयच्या चौकशीला कोणत्याही क्षणी कलाटणी मिळू शकते. अजूनही सीबीआयचा तपास थांबलेला नाही. महाराष्ट्र सरकारने मुद्दाम 65 दिवस सुशांत सिंग प्रकरण आणि ड्रग्ज प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र सरकारकडे तपास असताना हे लोक तुरुंगात गेले नाहीत. पण सीबीआयकडे तपास आल्यानंतर मात्र अनेकांना तुरुंगाची हवा खावी लागली. या प्रकरणाचा तपास करताना महाराष्ट्र सरकार हे कुंभकर्णाच्या निद्रेत होतं. सुशांत सिंगची हत्या की आत्महत्या याचा पहिला अहवाल येण्याअगोदरच राज्य शासनाने कसं काय घोषित करून टाकलं, की त्यांची आत्महत्या आहे. ड्रग्ज प्रकरण महाराष्ट्र सरकार का लपवत होतं हा मोठा प्रश्न आहे. या संपूर्ण प्रकरणातून आता ड्रग्ज प्रकरणही बाहेर आले आहे. त्यामुळे या सरकारने मुंबई पोलिसांची माफी मागितली पाहिजे, असं भाजपचे आमदार राम कदम यांनी म्हटलं.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा 14 जून रोजी आपल्या मुंबईतील राहत्या घरी मृतदेह आढळून आला होता. मुंबई पोलिसांनी पोस्टमार्टम रिपोर्टच्या आधारे सुशांतने आत्महत्या केल्याचं सांगितलं होतं. परंतु, सोशल मीडियावर करण्यात येत असलेले आरोप, सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी राबवण्यात आलेल्या मोहीमा आणि सुशांतच्या कुटुंबियांचे दावे यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं.
अभिनेता सुशांत सिंह राजपूच्या आत्महत्येनंतर समोर आलेल्या ड्रग्ज प्रकरणाल....
अधिक वाचा