ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्रात बदल

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 22, 2020 04:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्रात बदल

शहर : मुंबई

         मुंबई : आपण चित्रपट पाहण्यासाठी सेनेमाघरात किवा आपल्या घरच्या टीव्हीवर पाहत असताना सुरूवातीला सेन्सॉर बोर्डाचं प्रमाणपत्र आपल्या डोळ्यासमोर दिसते. सेन्सॉर बोर्ड हे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठीचे प्रतीक असल्याचे दर्शविले जाते.

           गेल्या कित्येक वर्षापासून चित्रपटाच्या सुरूवातीला सेन्सॉर बोर्ड प्रमाणपत्र दिसत होते. त्यामध्ये काही बदल करण्यात आले नव्हते. पण, आता सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्राला नवरूप देण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला आला आहे.

सेन्सॉर बोर्ड नवीन प्रमाणपत्र कसे असेल ?

       सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयामुळे चित्रपटाच्या सुरूवातीला नवीन प्रमाणपत्र पहायला मिळणार आहे. हे प्रमाणपत्र डिजिटल असणार आहे. सीबीएफसीकडून देशातल्या ९ क्षेत्रीय कार्यालयातून प्रमाणपत्राच्या बदलांची अंमलबजावणी करण्याचे सांगितले आले आहे. 

      नव्या प्रमाणपत्रामध्ये एक 'क्यूआर कोड' असणार आहे, त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला त्या चित्रपटासंबंधी हवी ती माहिती तुमच्यापर्यंत पोहचणार आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून हा क्यूआर कोड स्कॅन केल्यास युजर थेट सीबीएफसीच्या संकेतस्थळावर जाईल असे सीबीएफसीचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी सांगितले आहे. तेथे युजर्सना चित्रपटातील कलाकार, श्रेयनामावली, कथा, पटकथा, ट्रेलर, प्रोमो अशा प्रकारची सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे.     

मागे

खुशखबर ! अखेर 'तान्हाजी' चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त
खुशखबर ! अखेर 'तान्हाजी' चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त

       मुंबई - ठाकरे सरकारने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत '....

अधिक वाचा

पुढे  

राजमाता ‘जिजाऊंची यशोगाथा... 'जिऊ' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला  
राजमाता ‘जिजाऊंची यशोगाथा... 'जिऊ' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला  

      हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची माता ‘जिजाबा....

Read more