By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 10, 2020 01:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा बहुचर्चित 'छपाक' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. सिनेमा प्रदर्शित होताच दीपिका दादरच्या सिद्धीविनायक मंदिरात गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेली. दीपिका पदुकोण हिचा प्रत्येक सिनेमा प्रदर्शित होताच ती सिद्धिविनायक मंदिरात जाते. हा चित्रपट मध्यप्रदेश, छत्तीसगढ, पुद्देचेरी या राज्यात टॅक्स फ्री करण्यात आला. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी ट्विट करून या बाबत प्रेक्षकांना माहिती दिली.
'छपाक' हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित असून अॅसिड हालयातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट महिलांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतो. त्यामुळे हा चित्रपट सर्व महिलांनी पहावा, असे आवाहन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केले आहे. अधिकाधिक प्रेक्षकांनी पहावा यासाठी हा चित्रपट 'टॅक्स फ्री' करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, हा चित्रपट मेघना गुलझार यांनी दिग्दर्शित केला आहे. छपाक बरोबरच अजय देवगण, काजोल आणि सैफ आली खान यांचा 'तानाजी द अनसंग वॉरीअर' हा सिनेमाही प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे प्रेक्षक कोणत्या चित्रपटाला जास्त पसंती देतात ते पहाणे महत्वाचे ठरेल.
पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित ‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ ....
अधिक वाचा