By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 24, 2019 01:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अभिनेत्री दीपिका पदुकोणचा ‘छपाक’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. परंतु हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ‘छपाक’ अॅसिड हल्लापीडित लक्ष्मी अगरवाल हिच्या आयुष्यावर आधारित चित्रपट आहे. परंतु तिची कथा सर्वप्रथम आपणच लिहिली होती आणि त्या आधारावर ‘ब्लॅक डे’ नावाची पटकथा इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशनकडे (इम्पा) नोंदणीकृतही केलेली होती असा दावा लेखक राकेश भारती यांनी केला आहे. त्यांनी ‘छपाक’वर संहिताचोरीचा आरोप केला आहे. तसेच याबाबत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात चित्रपट प्रदर्शनाला आव्हान दिले आहे.
काय आहे राकेश भारती यांचा आरोप ?
“मी गेले अनेक महिने ‘ब्लॅक डे’च्या कथानकावर काम करत आहे. दरम्यान मी चित्रपट निर्मितीसाठी फॉक्स स्टारसह अनेक निर्मात्या कंपन्यांशी संपर्क देखील साधला होता. परंतु मला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. आता फॉक्स स्टारकडूनच या पटकथेवर चित्रपट निर्मिती केल्याचे मला कळले. त्यामुळे मी निर्मात्यांकडे आपली नाराजी व्यक्त केली. परंतु त्यांनी माझ्या विनंतीची नोंद घेतली नाही. अखेर मला न्यायालयात जावे लागले.” असा आरोप राकेश भारती यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणावर २७ डिसेंबरला न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली- विज्ञान भवनात आज सोमवारी उपराष्ट्रपती वैंकय्या ....
अधिक वाचा