By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 18, 2020 01:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
गेल्या काही महिन्यांपासून कलाकारांच्या आत्महत्यांचं सत्र काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. त्यातच सध्या आणखी एका अभिनेत्रीनं काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या अभिनेत्रीच्या आत्महत्येच्या तपासाअंतर्गत पोलिसांनी तिघांना अटक केल्याचं कळत आहे.
श्रावणीची आई, Paparatnam यांनी एस.आर. नगर पोलीसांकडे याबाबतची तक्रार दाखल केल्यानंतर सदर प्रकरणाचा तपास करण्यात आला. ज्यामधून काही धक्कादायक माहितीही समोर आली. पोलिसांना तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय अभिनेत्री श्रावणी हिचे टीवी अभिनेता देवराज रेड्डी (24), अनंतपूर येथील मालमत्ता व्यावसायिक साई कृष्ण रेड्डी (28) आणि निर्माता अशोक रेड्डी या तीन व्यक्तींसोबत प्रेमसंबंध होते. या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
साई कृष्ण रेड्डी आणि श्रावणी यांच्यामध्ये तीन वर्षांसाठी प्रेमसंबंध होते. यादरम्यानच्या काळात त्यानं श्रावणीच्या कुटुंबाला आर्थिक मदतही केल्याचं म्हटलं जातं. पण, काही कारणास्तव त्यांच्या नात्याला तडा गेला आणि २०१८ मध्ये हे दोघंही वेगळे झाले. पण, त्यानंतरही ते एकमेकांच्या संपर्कात मात्र होते.
देवराज आणि श्रावणीची भेट टीकटॉकच्या माध्यमातून झाली. तिनं त्याच्यासाठी काही व्हिडिओसुद्धा केले. नोव्हेंबर महिन्यात देवराज एका मालिकेच्या ऑडिशनसाठी हैदराबादमध्ये आला असता श्रावणीच्याच निवासस्थानी वास्तव्यास होता अशी माहिती समोर येत आहे. ज्यानंतर त्यांनी या नात्यात आणखी जवळीक साधली. श्रावणीच्या या नात्याबाबत तिच्या भावाला कल्पना होती.
पुढं श्रावणीचं अशोर आणि साई या दोघांसोबत नातं असल्याचं देवराजला कळलं. त्यानं तिचा फोन नंबर ब्लॉक करत हे नातं इथंच थांबवण्याची हालचाल केली. श्रावणीनं त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, देवराज मात्र तिचं ऐकला नाही. फेब्रुवारीमध्ये देवराज आणि साई कृष्ण रेड्डी यांच्यात कडाक्याची भांडणं आणि हाणामारी झाल्याचंचही म्हटलं जात आहे. या साऱ्यामध्ये श्रावणीवर वारंवार मानसिक आघात होत होते, ज्यामुळं परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून अखेर तिला आत्महत्येचं पाऊल उचलावं लागलं. ८ सप्टेंबरला तिनं आत्महत्या केली.
सेलिब्रिटी फॅशन डिझायनर शरबरी दत्ता sharbari dutta यांचं वयाच्या ६३ व्या वर्षी निधन ....
अधिक वाचा