ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दादरमधील चित्रा सिनेमागृहाचा आजचा शेवटचा ‘शो’

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 16, 2019 12:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दादरमधील चित्रा सिनेमागृहाचा आजचा शेवटचा ‘शो’

शहर : मुंबई

गेल्या 36 वर्षांपासून विविध चित्रपट पडद्यावर दाखवून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे चित्रा सिनेमागृह लवकरच बंद होणार आहे. अभिनेता टायगर श्रॉफचा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ या चित्रपटाचा शेवटचा शो या सिनेमागृहात दाखविला जाणार आहे. 550 सीट असलेलं हा सिनेमागृह गुरुवारी बंद होणार आहे.
1983 साली प्रदर्शित झालेला अभिनेता जॅकी श्रॉफचा ‘हिरो’ हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला होता. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रा सिनेमागृहाजवळ प्रचंड गर्दी केली होती. त्यावेळी या सिनेमागृहात या चित्रपटाचे हाऊसफुल शो सुरु होते. विशेष म्हणजे जॅकी श्रॉफचा सिनेमा ज्या सिनेमागृहात सुपरहिट ठरला, त्याच जॅकी श्रॉफच्या मुलाचा म्हणजेच टायगर श्रॉफच्या सिनेमाचा आज शेवटचा शो येथे होणार आहे.
36 वर्षांपासून सुरु असलेल्या या सिनेमागृहाची धुरा पी.डी मेहता यांच्या मुलाने दारा मेहता यांनी सांभाळली होते. मात्र प्रेक्षकांच्या अल्पप्रतिसाद आणि आर्थिक चणचण जाणवत असल्यामुळे हा सिनेमागृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मागे

अ‍ॅव्हेंजर्सच्या टीममध्ये मोदींची एंट्री; सोशल मीडियावर धुमाकूळ
अ‍ॅव्हेंजर्सच्या टीममध्ये मोदींची एंट्री; सोशल मीडियावर धुमाकूळ

तेजस्वी सूर्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना रियल हिरो म्हटलं आहे. त्यां....

अधिक वाचा

पुढे  

 सनीने पटकावला ’न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल’मध्ये सर्वोत्कृष्ट बाल कलाकारचा पुरस्कार
सनीने पटकावला ’न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल’मध्ये सर्वोत्कृष्ट बाल कलाकारचा पुरस्कार

11 वर्षीय सनी पवार पुन्हा एकदा परदेशात डंका पिटला. सनीने 19 व्या न्यूयॉर्क इंड....

Read more