By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 05, 2019 12:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून रुपेरी पडद्यापासून लांब असलेला अभिनेता सनी देओल लवकरच ‘ब्लँक’ चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘ब्लँक’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा फार रंजक असल्याचे ट्रेलरमधून समोर आले आहे. आता चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘टेररिझमचा कोणताही चेहरा नसतो. त्याचा धर्म फक्त पैस असतो आणि आपला धर्म फक्त ड्युटी’, सनी देओलच्या या जबरदस्त डायलॉगने या ट्रेलरची सुरुवात होते. या चित्रपटात सनी व करणसोबत इशिता दत्ता आणि करणवीर शर्मा हे देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
‘ब्लँक’ चित्रपटात एक असा दहशवादी दाखवण्यात आला आहे जो चालता फिरता बॉम्ब आहे. परंतु एका अपघातामध्ये त्याची स्मृती भ्रष्ट होते. त्यानंतर त्याच्या शरीराला जोडण्यात आलेला बॉम्ब कशा प्रकारे काढावा असा प्रश्न पोलिस ऑफसर सनी देओल समोर उभा राहतो. या दहशवाद्याच्या शरीराला जोडण्यात आलेला बॉम्ब त्याच्या हृदयाशी जोडण्यात आला आहे. दहशतवादी आणि त्याच्या शरीरावरील बॉम्ब काढण्यासाठी पोलिसांची चाललेली धावपळ हे उत्कृष्टपणे ‘ब्लँक’ चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीवर आणि त्या....
अधिक वाचा