ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दिशा पटानीच्या सोशल मीडियावरील पोस्टने सा-या भारतीयांचा ऊर अभिमानाने भरुन येईल.

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 20, 2019 11:10 AM 2019-02-12T14:15:30+5:30

दिशा पटानीच्या सोशल मीडियावरील पोस्टने सा-या भारतीयांचा ऊर अभिमानाने भरुन येईल.

शहर : मुंबई

दिशा पटानी  सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. तिचे आगामी सिनेमा आणि वैयक्तिक जीवनातील घडामोडींवर तिच्या फॅन्सची नजर असते. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही दिशा आपल्या फॅन्सशी नेहमीच संवाद साधत असते. तसेच, स्वतःचे फोटो, व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससाठी शेअर करते. ब-याचदा तिच्या हटके ड्रेसिंग सेन्समुळे नेटिझन्स तिची  खिल्ली उडवतानाही दिसतात. मात्र पहिल्यांदाच दिशाच्या एका पोस्टमुळे सारेच खूप कौतुक करताना दिसतायेत. दिशाने यावेळी  तिच्या बहिणीचा फोटो शेअर केला आहे. शेअर केलेला फोटोही खूप खास आहे. दिशाची बहिण भारतीय सैन्यात अधिकारी आहे. तिने बहिणीचा वर्दीमधील एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. खुशबू असे तिच्या बहिणीचे नाव असून, हा फोटो पाहून तमाम भारतीयांची मान अभिमानानं उंचावल्याशिवाय राहणार नाही. सध्या हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्याला मोठी पसंती मिळत आहे. याआधीही दिशाने बहिणीसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. पण वर्दीतील बहिणीच्या या फोटोची बातच  न्यारी आहे. दिशा पटानी  येत्या ५ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या भारतमध्ये दिसणार आहे. तसेच दिशा दिग्दर्शित मोहित सूरीच्या आगामी मलंग आणि बागी ३ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मागे

चित्रीकरणादरम्यान भडक मेकअपमुळे भूमी पेडणेकरचा चेहरा होरपळला
चित्रीकरणादरम्यान भडक मेकअपमुळे भूमी पेडणेकरचा चेहरा होरपळला

तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर गेल्या काही दिवसांपासून 'सांड की आंख' चित्र....

अधिक वाचा

पुढे  

माझ्यामुळे तुमच्या संसारात शांतता नांदत असेल, मोदींची अक्षयला कोपरखळी...
माझ्यामुळे तुमच्या संसारात शांतता नांदत असेल, मोदींची अक्षयला कोपरखळी...

सध्या सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत जोरदार ट्रेण्ड सुरू ....

Read more