By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 06, 2020 10:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात आता ईडीने वेगवान तपास सुरु केला आहे. ईडीच्या तपासात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीकडे कोट्यावधी रुपये किमतीचे दोन फ्लॅट असल्याचं उघड झालं आहे. या फ्लॅटमधील गुंतवणुकीची कसून चौकशी होत आहे. फ्लॅटचा व्यवहार आता ईडीच्या रडार आहे. रियाला शुक्रवारी (7 जुलै) चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलं आहे.
दुसरीकडे बिहार सरकारच्या सीबीआय चौकसीच्या प्रस्तावानंतर केंद्र सरकारने सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. केंद्र सरकारने याबाबत आज आदेश दिले. यानंतर सीबीआयने तातडीने या प्रकरणी रिया चक्रवर्ती, इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअर मिरिंडा, श्रृती मोदी आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, सुशांत सिंगच्या वडिलांनी बिहार पोलिसांकडे तक्रार दाखल केली. यात अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यासह तिच्या जवळचे काही लोकांवर गंभीर आरोप आहेत. यानंतर बिहार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली होती. या गुन्ह्यात रियावर सुशांतला डांबून ठेवणे, त्याला धमकावणे, त्याच्या पैशाचा अपहार करणे आणि त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. रियाने सुशांतच्या बँक खात्यातून सुमारे 15 कोटी रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. हा सर्व व्यवहार संशयास्पद आहे. यामुळे याचा तपास आता ईडीचे अधिकारी करत आहेत.
ईडीने आतापर्यंत या प्रकरणात 4 जणांचे जबाब घेतले आहेत. आधी सुशांतचे सीए संदीप श्रीधर आणि सुशांतच्या एका मित्राचा जबाब घेतला आहे. यानंतर आता रियाशी सबंधित लोकांचे जबाब घेतले जात आहेत. 15 कोटी रुपयांची मनीं लाँड्रिंग कशी झाली. सुशांतच्या बँक खात्यातून कोणाच्या खात्यात पैसे गेले आहेत. तो व्यक्ती कोण आहे, याचा ईडीचे अधिकारी शोध घेत आहेत.
रियाचे सीए रितेश शाह यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे, पण ते अपूर्ण झालं आहे. आज रियाच्या घरातील मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यालाही ईडी अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी बोलावलं. मिरांडा दुपारी दीड वाजता चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाला. मिरांडा हा रियाचे पैशाचे व्यवहार पहायचा. बँक खाती, पैसे काढणे, पैसे टाकणे, आर्थिक व्यवहारात पैशांची देवाण घेवाण करणे आदी काम मिरांडा करायचा.
रियावर पैशांच्या अफरातफरीचा आरोप झाल्याने आता रियाचे व्यवहार सांभाळणाऱ्यांना बोलावलं जात आहे. आज मिरांडा याची सुमारे 6 तास चौकशी चालली. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या चौकशीत ईडीच्या अधिकाऱ्यांना अनेक बाबतीत लीड मिळालं आहे. रियाचा एक फ्लॅट खार येथे असून तो तिच्या स्वतःच्या नावावर आहे. एक फ्लॅट उलवे येथे आहे. हा फ्लॅट रियाच्या वडिलांच्या नावावर आहे. या दोन्ही फ्लॅटची किंमत काही कोटी रुपयात आहे. त्यामुळे ईडीच्या चौकशीत रियाला अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागणार आहेत.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि मराठी अभिनेता आशुतोष भाकरे यांच्या आत्महत्....
अधिक वाचा