By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 24, 2019 02:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
तारक मेहता का उलटा चष्मा फेम दिशा वकानी हिने मालिकेमधून काढता पाय घेतला आहे. त्यानंतर मालिकेत होत असलेल्या दयाबेन या पात्राच्या चर्चांना पूर्णविराम लागले आहे. तर आता दयाबेनची भूमिका कोण साकारणार या चर्चांनी जोर धरला आहे. दयाबेन पात्राच्या शोधासाठी निर्मात्यांचा चांगलाच आटापिटा चालू होता. तर, दयाबेनच्या भूमिकेसाठी अभिनेत्री आमी त्रिवेदीला आप्रोच करण्यात आल्याच्या चर्चा रंगत आहेत. आमीला विचारण्यात आल्यानंतर, तिने आपल्याला दयाबेनच्यी भूमिकेबद्दल कोणत्याही प्रकारची विचारणा न करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे निर्माते आमीला दिशा वकानीच्या जागेवर घेण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. त्याचप्रमाणे आमीचे मित्रमंडळीही तिला दयाबेनची भूमिका साकारण्यासाठी आग्रह करत आहेत. परंतू निर्मात्यांकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मागील काही दिवसांपासून मालिका निर्माते असित मोदी दयाबेन भूमिकेच्या शोधात आहेत. असित मोदी म्हणाले, मला दयाबेन पात्रासाठी शोधकार्य सुरू करावे लागणार आहे. कोणताही कार्यक्रम कलाकारापेक्षा मोठा नसतो. तारक मेहता का उलटा चष्मा दिशा वकानी शिवाय पुढे मार्गक्रमण करेल. तर आता दयाबेन ही लोकप्रिय व्यक्तीरेखा कोण साकारणार हे बघणे औत्सुक्याचे असणार आहे.
सध्या सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत जोरदार ट्रेण्ड सुरू ....
अधिक वाचा