By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 08, 2020 05:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. सुशांतच्या आत्महत्येपूर्वी माजी मॅनेजर दिशा सालियन हिने आत्महत्या केली होती. दिशा सालियन आणि सुशांतच्या आत्महत्येचा एकमेकांसोबत काही संबंध आहे का, याचा पोलीस शोध घेत आहे. नुकतंच दिशा सालियनचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. त्यात तिच्या अंगावर कपडे नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यासोबतच तिच्या आत्महत्येच्या काही तासांपूर्वीचा एक व्हिडीओही समोर आला आहे.
दिशा सालियनने 8 जूनला चौदाव्या मजल्यावरील आपल्या फ्लॅटमधून उडी मारुन आत्महत्या केली होती. त्या दिवशी दिशाच्या घरी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ती त्या पार्टीत फार खूश होती. याबाबतचा एक व्हिडीओही तिने व्हॉट्सअॅपच्या ग्रुपमध्ये पोस्ट केला होता.या पार्टीत केवळ सहा जण सहभागी झाले होते. त्यात कोणताही राजकीय नेता उपस्थित नव्हता. दिशाचे मित्र या पार्टीत होते. हा व्हिडीओ 8 जून रात्री 11 वाजून 48 मिनिटांनी काढलेला आहे. यात ती मित्रांसोबत डान्स करत होती.
त्याशिवाय दिशाचा शवविच्छेदन अहवालही समोर आला आहे. या अहवालात आठव्या क्रमांकावर मृतदेहाच्या अंगावर कपडे नव्हते असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच ज्यावेळी दिशाचा मृतदेह पोलिसांना मिळाला होता, त्यावेळीही तिच्या अंगावर कपडे नव्हते, असे यात नमूद करण्यात आलं आहे.
दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची ईडीकडून कसून चौकशी केली. ईडीच्या 4 अधिकाऱ्यांनी रियाची कसून चौकशी केली. ईडी कार्यालयात रियासोबत तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी उपस्थित होते.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची ई....
अधिक वाचा