By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 30, 2023 11:49 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
घरच्यांविरोधात बंडखोरी करुन ती अभिनेत्री होण्यासाठी मुंबईत पळून आली. सुरुवतीला चांगलं यशही मिळालं मात्र त्यानंतर जे काही घडलं ते फारच धक्कादायक होतं.
चित्रपटसृष्टीमधील लोकप्रियता आणि आकर्षित करणारा पैसा सर्वांनाच संभाळता येतो असं नाही. रोज हजारोंच्या संख्येनं मायनगरी मुंबईमध्ये तरुण-तरुणी कलाकार होण्याचं स्वप्न उराशी बाळगून येतात. मात्र यापैकी अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्यांनाच या झगमगत्या दुनियेकडून स्वीकारलं जातं. मात्र या क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी धडपड करुनही अपयश आलेल्यांना हे अपयश पचवता येत नाही आणि ते स्वत:चं आयुष्य उद्धवस्त करुन घेतात. अशीच एक अभिनेत्री आहे मिताली शर्मा. एकेकाळी निर्मात्यांची पहिली पसंत असलेल्या या अभिनेत्रीवर अगदी भीक मागण्याची वेळ आली. जिवंत राहण्यासाठी या अभिनेत्रीला चोरीही करावी लागली होती. याच अभिनेत्रीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
नक्की घडलं काय?
मिताली शर्मा ही एक भोजपूरी अभिनेत्री आहे. तिचे सुरुवातीचे चित्रपट जबरदस्त हीट ठरले. या चित्रपटांनी तिकीटबारीवर दमदार कामगिरी केली. मितालीला अल्पावधीत मिळलेल्या या यशामुळे भोजपुरीमधील सर्वच निर्माते आणि दिग्दर्शक इतर कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा तिलाच अधिक प्राधान्य देत होते. मात्र नंतर मितालीच्या चित्रपटांना प्रतिसाद मिळेनासा झाला. त्यामुळे हळूहळू सर्वांनी तिच्यापासून दूर जाण्यास सुरुवात केली. जे निर्माते आणि दिग्दर्शक तिच्या घराबाहेर रांग लावून उभे असायचे तेच तिला टाळू लागले. एक वेळ अशी आली की तिला काम मिळणं बंद झालं. तिला अचानक मिळालेली प्रसिद्धी आणि त्यानंतर करिअरला लागलेली उतरती कळा सहन झाली नाही.
Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Monsoon Live Updates | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Live Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे |
सुकेश चंद्रशेखर आणि त्यांची पत्नी लीना मारियासह इतर ६ जणांविरुद्ध अंमलबजा....
अधिक वाचा