By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 05, 2019 12:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
न्यूयॉर्क : प्रसिद्ध गायिका ब्रिटनी स्पिअर्स ही सध्या मानसिक आजाराने त्रस्त असून तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी ब्रिटनी तीस दिवसांच्या काऊन्सिलिंग सेशनसाठी रुग्णालयात भरती झाली. ब्रिटनीचा बॉयफ्रेंड सॅम असघारी याने ही माहिती दिल्याचे समजत आहे.
ब्रिटनीचे वडील हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्यावर दोन शस्त्रक्रीया झाल्या असून तरीही त्यांच्या तब्येतीमध्ये कोणतेही सुधारणा दिसत नाही. वडिलांच्या आजारपणामुळे ब्रिटनी नैराश्यात गेली होती. तिने तिचे महत्त्वाचे कॉन्सर्ट देखील रद्द केल्याचे समजते. तिला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी ब्रिटनीच्या बॉयफ्रेंडने तिला रुग्णालयात दाखल केल्याचे समजते.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून रुपेरी पडद्यापासून लांब असलेला अभिनेता सनी....
अधिक वाचा