ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सोशल मीडियाला कंटाळली ‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेख, घेतला हा निर्णय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 21, 2019 12:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सोशल मीडियाला कंटाळली ‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेख, घेतला हा निर्णय

शहर : मुंबई

दंगल गर्ल फातिमा सना शेख हिने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. फातिमा सोशल मीडियावर बरीच ॅक्टिव्ह असते. पण सध्या तिने एक वेगळा निर्णय घेतला आहे. होय, सोशल मीडियापासून काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय तिने घेतला आहे. याचे कारण काय तर, सोशल मीडियाबद्दल झालेला साक्षात्कार.

फातिमाच्या मते, सोशल मीडियावर लोक तासन् तास ऑनलाईन राहतात. आपल्या पर्सनल प्रोफेशनल गोष्टी शेअर करतात. कधी कधी हे सगळे प्रचंड तणाव वाढवणारे ठरते. अनेक लोक सोशल मीडिया ॅडिक्ट झाले आहेत. यास्थितीत फातिमा सोशल मीडियापासून काही काळ दूर राहणार आहे.

मी स्वत: सोशल मीडियापासून ब्रेक घेऊन काही काळ निवांत राहू इच्छिते. हा वेळ मी पुस्तके वाचण्यात घालवू शकते. सध्या मी वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके वाचण्याचा प्रयोग करतेय. सोशल मीडियावर अनेक तास व्यर्थ घालवण्याऐवजी वाचन करणे मला आवडेल. प्रत्येक महिन्यात चार-दोन चांगली पुस्तके वाचण्याचा निर्णय मी घेतलाय,’असे तिने सांगितले.

फातिमा तिच्या सोशल अकाऊंटवर सतत तिचे ट्रॅव्हल अपडेट देत असते. तिला फोटोग्राफीचा छंद आहे. त्यामुळे तिच्या इन्स्टा अकाऊंटवर तिने काढलेल्या फोटोंची भरमार आहे.

फातिमाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास, सध्या ती अनुराग बासू यांच्या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात फातिमा राजकुमार रावसोबत दिसणार आहे. नुकतेच भोपाळमध्ये या चित्रपटाचे फर्स्ट शेड्यूल पूर्ण झाले. याआधी ती आमिर खानच्याठग्स ऑफ हिंदोस्तानमध्ये दिसली होती. पण हा चित्रपट दणकून आपटला होता.

मागे

वेब सीरिजच्या सेटवर उच्छाद मांडणाऱ्यांपैकी सात जणांना अटक
वेब सीरिजच्या सेटवर उच्छाद मांडणाऱ्यांपैकी सात जणांना अटक

बुधवारी अभिनेत्री माही गिल आणि इतर कलाकार घोडबंदर रोड येथील एका फॅक्ट्रीमध....

अधिक वाचा

पुढे  

मोगैंबो खुश हुआ... डुडलकडून अमरीश पुरींना मानवंदना
मोगैंबो खुश हुआ... डुडलकडून अमरीश पुरींना मानवंदना

अत्यंत सृजनशील पद्धतीने जुन्या घटना किंवा व्यक्तींच्या आठवणींना उजाळा दे....

Read more