By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 11, 2020 01:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई – ‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पाहिल्याच दिवशी कमाल केली आहे. पाहिल्याच दिवशी कोटींची कमाई करणार्यार या चित्रपटाने १५ कोटींचे कलेक्शन केले. तर ‘छ्पाक’ने केवळ ५ कोटींची कमाई केली. ओम राऊत दिग्दर्शित ‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ने पाहिल्याच दिवशी कोटींची कमाई केल्याची माहिती ट्रेड अनॅलिस्ट राज बंसल यांनी ट्विट करून दिली. ‘तान्हाजी’ चित्रपटात अभिनेता अजय देवगण, सैफ अली खान, काजोल हे कलाकार मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत. हा चित्रपट अजय देवगणच्या संपूर्ण करिअरमधील १००वा चित्रपट आहे.
दरम्यान, या चित्रपटाच्या निमित्ताने सैफ आणि अजय ही जोडी तब्बल १३ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर एकत्र पाहायला मिळाली. या चित्रपटात अभिनेता अजय देवगणे तान्हाजींची भूमिका साकारली आहे.तर तान्हाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका काजोल साकारताना दिसत आहे. सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत दिसत आहे त्याचबरोबर मराठमोळा अभिनेता शरद केळकर शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे तर राजमाता जिजाऊंची भूमिका पद्मावती राव करीत आहेत.
मुंबई- मराठीतील नावाजलेले कलाकार गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत बो....
अधिक वाचा