By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 22, 2019 05:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
सर्वाधिक कमाई करणार्या टॉप10 मध्ये अक्षय कुमार हा एकमेव बॉलीवुडचा अभिनेता आहे. गेल्या वर्षीच्या यादीत अक्षय कुमार 7व्या तर सलमान खान 9 व्या स्थानावर होता.
या वर्षी ' फोर्ब्स' ने जाहीर केलेल्या यादीनुसार 1 जून 2018 ते 1 जून 2019 या काळात अक्षय ची अंदाजे कमाई सुमारे 65 मिलियन डॉलर म्हणजेच 465 कोटी रुपये इतकी आहे. सर्वाधिक कमाई करणार्यात हॉलीवुड अभिनेता ड्वेल जोन्सोन पहिल्या क्रमांकावर असून त्याची या वर्षीची कमाई 89.4 मिलियन डॉलर म्हणजे 640 कोटी रुपये आहे. दुसर्या स्थानावरील क्रिस हेंमस्वर्थची 74.4 मिलियन डॉलर तर रॉबर्ट ज्यूनियरची कमाई 66 मिलियन डॉलर इतकी आहे.
अक्षय कुमार आपल्या कमाईतील काही भाग दानही करताना दिसतो. नुकतीच त्याने पुरग्रस्तासाठी 2 कोटी रुपये मदत दिली. तर काही दिवसापूर्वी आसामच्या चीफ मिनिस्टर रिलीफ फंड आणि काजिरंगा नॅशनल पार्क साठी 1-1 कोटीची मदत केली होती. त्याच बरोबर त्याने ' भारत के वीर' या नावाने एक अप लॉंच केले आहे. त्याव्दारे तो शहिदांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत ही करीत असतो. नुकताच प्रदर्शित झालेल्या 'मिशन मंगल' ने 100 कोटीचा टप्पा पार केला आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज संगीतकार मोहम्मद झहुर खय्याम यांचे काल दी....
अधिक वाचा