ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ऑस्कर शर्यतीच्या यादीतून 'गली बॉय' बाहेर

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 17, 2019 12:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ऑस्कर शर्यतीच्या यादीतून 'गली बॉय' बाहेर

शहर : देश

            भारताकडून ऑस्करच्या सर्वोत्तम परदेशी भाषा चित्रपट विभागासाठी ‘गली बॉय’ चित्रपटाची निवड करण्यात आली होती. मात्र, अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्सने जाहीर केलेल्या सर्वोत्तम दहा परदेशी भाषांमधील चित्रपटांच्या यादीमध्ये ‘गली बॉय’ला स्थान मिळालेले नाही. झोया अख्तर दिग्दर्शित अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा ‘गली बॉय’ हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीमधून बाहेर पडला आहे. त्यामुळे पुन्हा भारतीय चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.


            ‘गली बॉय’ या चित्रपटात झोपडपट्टीत लहानाचा मोठा झालेला आणि मुंबईच्या चाळ संस्कृतीतून रॅपर्सच्या दुनियेत नावलौकिक मिळवणाऱ्या ‘डिव्हाइन’ म्हणजे विवियन फर्नांडिस आणि ‘रॅपर नॅझी’ म्हणजेच नावेद शेख यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांपासून ‘गली बॉय’च्या कथानकासाठी प्रेरणा घेण्यात आली आहे. 


             दरम्यान, या चित्रपटामध्ये रणवीर आणि आलियासोबत विजयराज, कल्की केकला, सिद्धांत चतुर्वेदी, विजय शर्मा आणि अमृता सुभाष ही मंडळी मुख्य भूमिकेत दिसली होती. हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०१९ला प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 140 कोटींचा गल्ला जमा करत प्रेक्षकांची मनं जिकली. 
 

मागे

महेश भट्ट यांच्या ट्विटने मोदी सरकारची कानउघडणी
महेश भट्ट यांच्या ट्विटने मोदी सरकारची कानउघडणी

मुंबई - बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट सोशल मीडियावर सक्रिय असतात. ....

अधिक वाचा

पुढे  

निना गुप्ताला दिग्दर्शकांनीच दाखवला बाहेरचा रस्ता..!
निना गुप्ताला दिग्दर्शकांनीच दाखवला बाहेरचा रस्ता..!

            दिग्दर्शक "रोहित शेट्टी" यांनी 'सूर्यवंशी' या चित्र....

Read more