By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 24, 2019 01:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय मिळवून देणारी तसेच ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’ चित्रपटातून चाहत्यांच्या मनाला भूरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. आता कंगना पुन्हा एकदा एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे नाव ‘पंगा’ असे आहे. या चित्रपटात कंगना एका अनोख्या भूमिकेत दिसणार आहे. चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे. पण कंगना या चित्रपटाचे प्रमोशन थोड्या वेगळ्या पद्धतीने करत आहे.
नुकताच ‘पंगा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून चाहत्यांना आवडला असल्याचे म्हटले आहे. तसेच या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कंगना फार मेहनत घेत असल्याचे दिसत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कंगना मुंबई रेल्वे स्थानकावर बुकींग काऊंटवर लोकांना तिकिटे देताना दिसत आहे. तिचे हे फोटो मध्य रेल्वेने ट्विट करत पोस्ट केले आहेत.
Ms. Kangana Ranaut working at booking counter at #CSMT #StarChamber booking office for promotion of her upcoming movie #Panga today.@IRCTCofficial @KanganaTeam pic.twitter.com/W2tePOl0BJ
— Central Railway (@Central_Railway) December 23, 2019
‘पंगा’ या चित्रपटात ती मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली आधी कबड्डी खेळाडू असते. पण कुटुंबीयांना वेळ देता यावा यासाठी ती कबड्डी खेळणे बंद करते आणि रेल्वेमध्ये महिला कर्मचाऱ्याची नोकरी करताना दिसत आहे. कंगनाचा ‘पंगा’ हा चित्रपट एका कब्बडीपटूच्या जीवनावर आधारित आहे. तसेच या चित्रपटात कंगनासह जस्सी गिल, रिचा चड्ढा, पंकज त्रिपाठी आणि नीना त्रिपाठी हे कलाकार देखील झळकणार आहेत. हा चित्रपट २४ जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.
अभिनेता वरुण धवन आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत असलेला रेमो डिसुझा दिग्दर्शित ‘स्ट्रीट डान्सर 3D’ हा चित्रपट देखील २४ जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. कंगानाचा ‘पंगा’ आणि रेमोचा ‘स्ट्रीट डान्सर 3D’ आमने सामने असल्याने कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.