ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

“उन्होंने मेरी सूरत बदली है, मेरा मन नहीं”; हृदयाला हेलावून टाकणारा ‘छपाक’चा ट्रेलर...

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 10, 2019 02:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

“उन्होंने मेरी सूरत बदली है, मेरा मन नहीं”; हृदयाला हेलावून टाकणारा ‘छपाक’चा ट्रेलर...

शहर : देश

दीपिका पदुकोणचा बहुप्रतिक्षित छपाक सिनेमाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. सिनेमा दीपिकाने अॅसीड अटॅक पीडिता लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारली आहे. अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित चित्रपट दिग्दर्शिका मेघना गुलजार प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. 


अॅसिड हल्ल्यानंतर बदललेलं जीवन, आरोपींना शिक्षा देण्यासाठी केलेला संघर्ष आणि अॅसिड हल्ल्यानंतर पुन्हा एकदा आयुष्यात मिळालेलं प्रेम या सर्व गोष्टींची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. दीपिकासोबत विक्रांत मेस्सी यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. दीपिकाने मालतीची व्यक्तिरेखा अक्षरशः जगली हे म्हणणंही चुकीचं ठरणार नाही. 


दरम्यान, लग्नानंतरचा दीपिकाचा हा पहिला सिनेमा असल्यामुळे अनेकाच्या नजरा या सिनेमाकडे लागून राहिल्या होत्या. आता ट्रेलरमध्ये दीपिकाचा अफलातून अभिनय पाहिल्यावर तिने चाहत्यांच्या अपेक्षां पूर्ण केल्या असंच म्हणावं लागेल. पुढच्या वर्षी १० जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अजय देवगणच्या ‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाशी दीपिकाच्या ‘छपाक’ची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे.


 

मागे

कपिल शर्मा झाला बाबा; घरी आली गोंडस परी...
कपिल शर्मा झाला बाबा; घरी आली गोंडस परी...

सगळ्यांना पोट धरून हसायला लावणाऱ्या प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या घरी ....

अधिक वाचा

पुढे  

'वंडर वुमन १९८४' चा पावरफुल ट्रेलर प्रदर्शित, एकदा बघाच...
'वंडर वुमन १९८४' चा पावरफुल ट्रेलर प्रदर्शित, एकदा बघाच...

अनेक चाहते 'वंडर वुमन १९८४' या सिनेमाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत ....

Read more