By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 08, 2019 01:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
दीपिका गर्भवती असल्याच्या अनेक चर्चा होत्या. परंतु दीपिकाने एका मुलाखतीमध्ये ‘वेळ आल्यावर मी आई होण्याचा विचार करेल’ असे म्हणत या चर्चांना पूर्णविराम लावला होता. पण आता पुन्हा एकदा या चर्चांना उधाण मिळाले आहे. दीपिका नुकताच पार पडलेल्या, संपूर्ण फॅशन आणि कलाविश्वाचे लक्ष वेधलेल्या मेट गाला 2019 या सोहळ्यात सहभागी झाली होती. तिचा लूक अत्यंत ग्लॅमरस होता. काही चाहत्यांना तिचा हा लूक आवडला तर अनेकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केले. या सोहळ्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनससह दीपिकाने थोडा वेळ ही घालवला.
त्यातील एक फोटो प्रियांकाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार या फोटोवरुन दीपिका गर्भवती असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार या सर्व हस्यास्पद अफवा असल्याचे समोर आले आहे. सध्या दीपिका अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित ‘छपाक’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. तिचा हा चित्रपट मेघना गुलजार दिग्दर्शित करणार आहेत. तसेच मेघना गुलजार यांच्या या चित्रपटात दीपिकासोबत काम करण्याची मोठी संधी अभिनेता विक्रांत मेस्सीला दिली आहे. ‘छपाक’ हा चित्रपट 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे.
‘बिग बॉस मराठी’चं दुसरं पर्व 14 मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ....
अधिक वाचा