By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 07, 2019 01:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अभिनेत्री ईशा गुप्ता सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. ईशाचा 'वन डे : जस्टिस डिलिवर्ड' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपट पाहाण्यासाठी ती आपल्या मित्रांसह चित्रपटगृहात गेली होती. त्यानंतर मित्रपरिवारासोबत वेळ व्यतीत करण्यासाठी हॉटेलमध्ये गेली. हॉटेलमध्ये आलेला वाईट अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ईशाच्या या अनुभवावरून हॉटेलमध्ये देखील स्त्रिया सुरक्षीत नसल्याचे स्पष्ट होत आहे. नाराजी व्यक्त करत ईशाने हॉटेलमधील एका व्यक्तीवर गैरवर्तनणुकीचा आरोप केला आहे.
हॉटेल व्यावसायिक रोहित विगवर ईशाने गैरवर्तवणुकीचा आरोप केला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ईशा म्हणली की, 'रोहित माझ्याकडे पाहूण अश्लिल चाळे करत होता. जर या देशात माझ्यासारखी महिल सुरक्षित नसेल तर, बाकी मुली कशा सुरक्षित असतील. माझ्यासोबत सुरक्षारक्षक असताना ही मला असा अनुभव आला.' त्याचप्रामाणे ईशाने घडल्या प्रकाराचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे.ईशाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी तिला चांगलेच धारेवर धरले आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिने असे पाऊल उचल्याचे म्हटले जात आहे. ईशासोबत गैरवर्तन करणारा व्यक्ती गोव्यातील हॉटेलचा मालक आहे.
कॅन्सर मधून सावरलेले ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर 'झुठा कही का' या चित्र....
अधिक वाचा