ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भाभीजी म्हणते...मी पण चौकीदार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 07, 2019 11:58 AM 2019-02-12T14:15:30+5:30

भाभीजी म्हणते...मी पण चौकीदार

शहर : मुंबई

टेलिव्हिजनवरील 'भाभीजी घर पर है' मालिकेतून घरांघरात पोहचलेली अंगूरी भाभी अर्थात अभिनेत्री शुभांगी अत्रेनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा सत्तेत यावं असं म्हटलं आहे. भाजपा सरकारने गेल्या वर्षात प्रशंसनीय काम केलं आहे त्यामुळे येणाऱ्या पुढील काळासाठीही भाजपाने सत्तेत यावं. मी देखील चौकीदार आहे. आणि आपण सर्वांनीही आपल्या घराचे, आजू-बाजूच्यांचे, राज्याचे, देशाचे चौकीदार व्हायला हवं असंही शुभांगी अत्रेनी म्हटलं आहे. माझी ही वैयक्तिक मतं आहेत. आपल्या देशाने सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे. त्यामुळे कोणीही आपले विचार पूर्णपणे मांडू शकतो असेही तिने म्हटलंय.

शुभांगी अत्रेनी सोशल मीडियावरून आलेल्या अश्लिल प्रतिक्रियांबाबतही आपलं मत व्यक्त केलं. अशा प्रतिक्रियांमुळे अनेकदा निराश वाटते. परंतु त्याबद्दल काहीही फरक पडत नसल्याचंही तिनं म्हटलं आहे. या मालिकेतील 'तिवारीजी' भूमिका साकारणाऱ्या रोहितने मोदी सरकारकडून घेण्यात आलेले निर्णय लोकहिताचे आहेत. देशात आता काळा पैसा राहिलेला नाही. पूर्वी रिअल इस्टेट उद्योगात फसवणूक होत होती. परंतु आता असे उद्योग अस्तित्वात नसल्याचे रोहितने सांगितले आहे. मलखनची भूमिका साकारणाऱ्या दिपेश भानने मतदान हे आपला सर्वात मोठा हक्क असून आपण आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. सर्वानी योग्य त्या व्यक्तीची निवड करून देशात चांगले बदल होण्यासाठी पुढील वर्षासाठीही मोदींना निडवडून देऊ असे म्हटले आहे. 'टीका' भूमिका साकारणारा अभिनेता वैभव माथूरनेही लोकांनी योग्य निर्णय घेणे गरजेचे असून मतदान करण्यासाठी घराबाहेर पडण्याचे सांगितले आहे

मागे

नरेंद्र मोदी यांच्यावर आधारलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे मार्ग मोकळे झाले
नरेंद्र मोदी यांच्यावर आधारलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे मार्ग मोकळे झाले

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशोगाथ....

अधिक वाचा

पुढे  

वडोदऱ्यातून निवडणूक लढण्यास विवेक ओबेरॉय उत्सुक
वडोदऱ्यातून निवडणूक लढण्यास विवेक ओबेरॉय उत्सुक

पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटात खुद्द मोदींची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता वि....

Read more