By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 25, 2020 11:46 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अभिनेत्री राधिका आपटे हिने 2012 मध्ये ब्रिटिश संगीतकार बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केले होते, कारण व्हिसा मिळवणे सोपे होते, स्वतः राधिकाने याबाबत खुलासा केला आहे. तसेच राधिकाने सांगितले की, लग्नासारख्या गोष्टींवर तिचा विश्वास नाही.
सध्या बेनेडिक्टसोबत लंडनमध्ये असलेल्या राधिकाने अभिनेता विक्रांत मेस्सीसोबत बोलताना अनेक गोष्टी शेअर केल्या. हा व्हिडीओ विक्रांतने त्याच्या सोशल मीडिया हॅण्डलवर शेअर केला आहे.
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतचा राधिकाचा ‘राते अकेली है’ हा चित्रपट दोन महिन्यांपूर्वी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील राधिकाच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.
राधिका सध्या बेनेडिक्टसोबत लंडनमध्ये आहे. तिने तिचा लॉकडाऊन लंडनमध्येच घालवला. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत राधिकाने तिच्या लॉकडाऊनमधील रुटीनबाबत चर्चा केली होती.
राधिका म्हणाली की, मी केवळ एकच रुटीन फॉलो केलं नाही. या काळात मी खाण्यावर जोर दिला. खूप व्यायाम केला. थोडाफार लिहिण्याचा आणि पाहण्याचा प्रयत्न केला. या काही चांगल्या गोष्टी घडल्या आहेत, तसेच काही वाईट गोष्टीदेखील घडल्या आहेत.
मनोरंजन विश्वाचा ‘महानायक’ अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत का....
अधिक वाचा