By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 19, 2019 06:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडेमीचा 20 वा पुरस्कार सोहळा मुंबईत दिमाखात पार पडला. बॉलीवुड मधील अनेक दिग्गज या सोहळ्याला उपस्थित होते. या सोहळ्यात अनेक कलाकारांना आयफा पुरस्कार 2019 ने गौरविण्यात आले. 'राजी' चित्रपटातील दमदार भूमिकेमुळे अभिनेत्री आलिया भट ला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार रणवीर सिंगला प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदवीर जगदीप जाफरी यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार विजेते अन्य कलाकार सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्रीराम राघवन ( अंधाधून) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री अदितिराव हैदरी , सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता विकी कौशल, सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री सारा आली खान, सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता इशान खट्टर , 20 व्या वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री दीपिका पडूकोण , 20 व्या वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेता रणबिर कपूर, गेल्या 20 वर्षातील सर्वोत्कृष्ट संगीत प्रीतम, गेल्या 20 वर्षातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक राजकुमार हिराणी, सर्वोत्कृष्ट संगीत सोनू के टीटू की स्विटी , सर्वोत्कृष्ट कथा अंधाधून , सर्वोत्कृष्ट गीतकार अमिताभ भट्टाचार्य , सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक अरजित सिंग , सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका हर्षदीप कौर.
दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुनच्या फार्म हाऊसवर एका व्यक्तीचा मृतदेह आढळल....
अधिक वाचा