By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 13, 2020 04:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - जाहिरात विश्वातील राणी आणि बॉलीवुड चित्रपटांमधून देशात प्रथम क्रमांकावर कमाई करणारी अभिनेत्री म्हणजे दीपिका पदुकोण. पण जेव्हा ती जेएनयूच्या विद्यार्थ्यांना भेटली आणि तिने त्यांना पाठिंबा व्यक्त केला. त्यामुळेच जाहिरात कंपन्या बॅकफुटवर गेल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ब्रॅण्ड्सनी दीपिकाच्या जाहिराती दोन आठवड्यांपासून थांबवण्याचा तसेच काहींनी कमी दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. दीपिका पादुकोण ब्रिटानियाची गुडडे, तनिष्क, विस्तारा एअरलाईन्स तसेच अॅक्ससि बँकेसह २३ ब्रॅण्ड्ससाठी जाहिराती करते.
आपल्या 'छपाक' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तीन दिवस आधी (७ जानेवारी) दीपिका जेएनयू मध्ये गेली होती. दीपिकाच्या मूक पाठिंब्यानंतर सोशल मीडियावर ट्रोलर्सनी वादळ उठवलं. काही ब्रॅण्ड्सनी म्हंटलं आहे की, "दीपिका असलेल्या जाहिरातीचं प्रक्षेपण आम्ही कमी केलं आहे." तर दुसरीकडे कलाकारांचे एन्डॉर्समेंट सांभाळणा-या मॅनेजरनी सांगितलं की, "आगामी काळात जाहिरातींच्या करारात अशाप्रकारच्या अटी आणि शर्ती जोडल्या जातील, ज्यात कोणत्याही प्रकारच्या वादात अडकायचं नसतं," असं आयपीजी मीडियाब्रॅण्ड्सचे सीईओ शशी सिन्हा यांनी म्हंटलं आहे.
दरम्यान, 'छपाक'ने पहिल्या दोन दिवसांत ११.६७ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर रविवारी (१२ जानेवारी) चित्रपटाने ९ कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाचा एकूण खर्च ४० कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. दीपिकाची मालमत्ता १०३ कोटी रुपये आहे. तर एका सिनेमासाठी दीपिका १० कोटी तर जाहिरातींसाठी ८ कोटी रुपये घेत असल्याचं म्हंटले जात आहे.
मुंबई – ‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पाह....
अधिक वाचा