ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

इमरान काही न करता रातोरात बनला स्‍टार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 24, 2019 02:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30

इमरान काही न करता रातोरात बनला स्‍टार

शहर : देश

बॉलिवूडचा सीरियल किसर इमरान हाशमी तुम्‍हाला माहितीच आहे. पण, पाकिस्‍तानचा इमरान हाशमी तुम्‍हाला माहिती नसणार. काही वर्षांपूर्वी इमरान हाशमीचा डुप्‍लीकेटचे फोटोज सोशल मीडियावर व्‍हायरल झाले होते. हा व्‍यक्‍ती हुबेहुब इमरान खानसारखा दिसतो. त्‍या व्‍यक्‍तीचे नाव मजदाक जान असे आहे. मजदाक हा इमरानचा डुप्‍लिकेट आहे. तो पाकिस्‍तानमध्‍ये राहतो. 

विशेष म्‍हणजे तो जेव्‍हा सार्वजनिक ठिकाणी येतो तेव्‍हा लोक त्‍याच्‍याभोवती सेल्‍फी घेण्‍यासाठी गराडा करतात. मजदाक सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्‍ह राहतो. त्‍यामुळे त्‍याच्‍या सोशल मीडिया अकाऊंटमुळे तो प्रसिध्‍दीझोतात आला आहे. 

मजदाकला यायचयं अभिनय क्षेत्रात  

मजदाकला ॲक्‍टिंगची आवड आहे. तो लवकरच मॉडलिंग सुरू करणार असल्‍याचं समजतं. मजदाकने एका मुलाखतीत म्‍हटले, आपल्‍या चेहर्‍यामुळेच तो स्‍टार बनला आहे. जेव्‍हा लोक माझ्‍याकडे येऊन सेल्‍फी घेतात. माझ्‍याशी बोलण्‍याचा प्रयत्‍न करतात, तेव्‍हा मला चांगलं वाटतं. मला प्रसिध्‍दी मिळाली. यासाठी मला काहीच कराव लागलं नाही. मी खूप खूश आहे.

हुबेहुब चेहर्‍यामुळे रातोरात बनला स्टार

मजदाकने एका मुलाखतीत म्‍हटले होते, काही न करता केवळ चेहर्‍यामुळे तो रातोरात स्टार बनला आहे. मजदाक म्‍हणाला होता, "मला काहीच करावं लागलं नाही. मी इमरान खानचा डुप्‍लीकेट असल्‍यामुळे पाकिस्तानमध्‍ये मी स्टार बनलो आहे."

अशी आहे अभिनेता इमरान खानची फॅमिली...

इमरानचे वडील अनवर हाशमी तर आई माहेरा हाशमी आहे.इमरानने मुंबईतील सिडेनहॅम कॉलेजमधून पदवीचे शि२ण घेतले आहे. अभिनेत्री पूजा भट्ट, दिग्‍दर्शक मोहित सूरी आणि अभिनेत्री स्माइली सूरी (कलयुग) इमरानचे कझिन आहेत. चित्रपट निर्माते महेश भट्ट आणि मुकेश भट्ट इमरानचे मामा लागतात. इमरानने २००६ मध्‍ये परवीनशी विवाह केला होता. दोघांचा एक मुलगा अयान आहे. 

 

मागे

'तुला पाहते रे' मालिकेत लवकरच दिसणार शिल्पा तुळसकर
'तुला पाहते रे' मालिकेत लवकरच दिसणार शिल्पा तुळसकर

 झी मराठी वरील 'तुला पाहते रे' मालिकेने अल्पावधीतच चाहत्यांची मने जिंकल....

अधिक वाचा

पुढे  

१४ ऑगस्ट २०२० मध्ये 'भुज- प्राइड ऑफ इंडिया' होणार प्रदर्शित
१४ ऑगस्ट २०२० मध्ये 'भुज- प्राइड ऑफ इंडिया' होणार प्रदर्शित

बॉलिवूडमध्ये अनेक थोर व्यक्तिंवर बायोपिक साकारण्याची तयारी सुरू आहे. अन....

Read more