ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Indian Idol 11 च्या स्पर्धकानं नेहा कक्करला जबरदस्तीनं केलं KISS

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 21, 2019 04:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Indian Idol 11  च्या स्पर्धकानं नेहा कक्करला जबरदस्तीनं केलं KISS

शहर : मुंबई

रिअलिटी शो 'इंडियन आयडॉल'चा 11 वा सीझन लवकरच सुरू होत आहे. यावेळी या शोमध्ये नेहा कक्कर, विशाल ददलानी आणि अनु मलिक परिक्षक म्हणून काम पाहत आहेत. तर आदित्य नारायण या शोचं होस्टिंग करणार आहे. सध्या या शोची ऑडिशन सुरू असून काही दिवसांपूर्वी या ऑडिशनमध्ये पोहोचलेल्या एका स्पर्धकानं नेहा कक्करला जबरदस्तीनं किस करण्याचा प्रयत्न केला होता.

नेहा कक्करसोबत घडलेल्या या प्रकारानं सोशल मीडियावर बरीच खळबळ माजली होती. खासकरुन जेव्हा हे सर्व घडलं त्यावेळी दोन्ही परिक्षक मंचावर होते मात्र त्यावेळी त्यांनीही त्यावेळी गप्प राहणं पसंत केलं. पण त्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर होता. एका युजरनं विशालला याबाबत ट्वीटरवर विचारलं. त्यामुळे आता परिक्षक विशाल ददलानी यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

चाहत्यानं विशालला म्हटलं, मला खात्री आहे की तुम्ही त्या स्पर्धकाला सहजासहजी अजिबात सोडलं नसेल. तुम्ही करतर त्याला मार द्यायला हवा होता. ज्यामुळे तो पुन्हा असं काहीतरी करण्याची पुन्हा हिंमत करणार नाही. चाहत्याच्या या ट्वीटला विशालनं रिप्लाय केला आहे. त्यानं लिहिलं, मी पोलिसांना बोलवण्याचा सल्ला दिला होता मात्र नेहानं त्याला जाऊ दिलं. त्याला मानसोपचार तज्ञाची गरज आहे आणि त्यासाठी आम्ही त्याची मदत नक्की करु.

सोनी टीव्हीच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. यामध्ये सर्व स्पर्धकांच्या ऑडिशनची झलक पाहायला मिळाली. सर्व स्पर्धकांच्या परफॉर्मन्सवर परिक्षक खूप खूश होते. पण व्हिडीओच्या शेवटी एक स्पर्धक खूप सारे गिफ्ट घेऊन पोहोचला. हे सर्व गिफ्ट नेहाला दिले. नेहा त्यावर खूश होऊन त्याला मिठी मारली. पण एवढ्यात तो नेहाला गालावर किस केलं. शो होस्ट आदित्य नारायण त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण इतक्यात नेहा लगेचच तिथून बाजूला झाली. या घटनेमुळे दुसरे परिक्षकही हैराण झालेले दिसले. आता मात्र हा व्हिडीओ सोनी टीव्हीनं डिलीट केला आहे.

मागे

कशी झाली डॅनिअल आणि सनीची ओळख
कशी झाली डॅनिअल आणि सनीची ओळख

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने आपल्या पतीचा डॅनिअल वेबरचा 41 वा वाढदिवस साजर....

अधिक वाचा

पुढे  

रुग्णवाहिका न मिळाल्याने मराठी अभिनेत्रीचा मृत्यू
रुग्णवाहिका न मिळाल्याने मराठी अभिनेत्रीचा मृत्यू

रुग्णवाहिका योग्य वेळेत पोहचण्यात अपयशी ठरल्यामुळे अभिनेत्री पूजा झुंझार....

Read more