By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 19, 2019 01:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
हम दिल दे चुके सनम या चित्रपटात सलमानने भन्साळींसोबत काम केले होते. त्यानंतर या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या. या चित्रपटानंतर १९ वर्षांचा काळ लोटला पण दिग्दर्शक भन्साळी आणि सलमानची जोडी काही एकत्र काम करताना पाहायला मिळाली नाही. आता मात्र इतक्या वर्षांनंतर सलमान संजय लीला भन्साळी यांच्या ईन्शाल्ला चित्रपटात सलमान काम करण्यास तयार झाला आहे. या चित्रपटात सलमानसह अभिनेत्री अलिया भट्ट देखील काम करणार आहे. तसेच या दोघांची जोडी रोमॅन्टीक रुपात दिसणार असल्याची चर्चा सुरू आहे. ईन्शाल्ला चित्रपटात सलमान ४० वर्षांच्या एका उद्योगपतीची भूमिका साकारणार आहे. तर २० वर्षांची आलिया इन्डस्ट्रीमधील नव्या अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्या दोघांच्या वयातील फरक अधोरेखित करण्यात आलाय. तसेच चित्रपटात त्या दोघांची जोडी रोमॅन्टीक अंदाजात दिसणार आहे. सलमान आणि आलियाची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.
भन्साळींच्या या चित्रपटात आधी सलमानसोबत शाहरुख खानच्या नावाचीही चर्चा होती. त्याचप्रमाणे भन्साळी अभिनेत्री दीपिका पदुकोणसाठी आग्रही असल्याचेही म्हटले जात होते. पण अखेर सलमान आणि आलियाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय.
बहुचर्चित 'कलंक' अखेर १७ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. 'कलंक&....
अधिक वाचा