By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 10, 2019 10:34 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अगदी लहान वयात बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या आलियानं अल्पावधीतच यशाची पायरी चढली. तसेच, आपल्या प्रत्येक भूमिका या वेगळ्या आणि आधीपेक्षाही सरस असतील असा प्रामाणिक प्रयत्न तिचा नेहमीच असतो. ‘राझी’ चित्रपटातल्या सर्वोत्तम अभिनयासाठी तिला यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तर, फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित झालेल्या गली बॉय मधल्या भूमिकेसाठीही तिचं विशेष कौतुक करण्यात होत. आलियाचा कलंक चित्रपटही प्रदर्शित होत आहे या चित्रपटातील रुप या भूमिकेसाठी आपण पाकिस्तानी अभिनेत्रीकडून प्रेरणा घेतल्याचं आलिया सांगते.
कलंक चित्रपटातील भूमिकेसाठी आपण मुघल ए आझम उमरावजान यांसारख्या चित्रपटातून संदर्भ घेतले. माञ, ही भूमिका साकारण्यासाठी पाकिस्तानी मालिका ‘झिंदगी गुलझार है’ ची ही खूप मदत झाल्याचं तिनं म्हटलं आहे. विशेष म्हणजे सनम सइदला ही बातमी समजताच तिनं ट्विटरवरून आलियाचे आभार मानले तसेच आलियाला चित्रपटासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
आगामी लोकसभा निवडणूकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक असलेला....
अधिक वाचा