By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 29, 2020 09:51 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
गेल्या महिन्याभरापासून सीबीआय सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास करू लागली आहे. पण आता प्रकरण अमली पदार्थापर्यंत आलं. एकिकडे एनसीबी म्हणजे, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चौकशी करू लागलं आहे. त्यात अनेक बॉलिवूडचे कलाकार अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच मुळात ज्यासाठी हा तपास सुरु झाला त्या सुशांतच्या मृत्यूबद्दलचं गूढ मात्र काही उकललेलं नाही. त्यामुळे सीबीआय नेमकं काय करतंय यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाऊ लागलं आहे.
सुशांतसिंह राजपूतच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंह यांनीही सीबीआयच्या कामावर शंका उपस्थित केली होती. सीबीआय इतक्या जलद गतीने काम करत असेल तर त्यांनी आत्तापर्यंत काहीतरी निष्कर्ष काढणं आवश्यक होतं असं त्यांचं म्हणणं होतं. शिवाय, सुशांतच्या कुटुंबियांनीही अनेक प्रश्न उपस्थित केले होते. सुशांतच्या मृत्यूबद्दल काहीतरी समोर यायला हवं असा आग्रह सुशांतच्या कुटुंबियांनीही धरला होता. यावर लवकर भाष्य झालं नाही तर दिल्लीत उपोषण करण्याचा इशाराही सुशांतच्या कुटुंबियांनी दिला होता. यावर आता सीबीआयने आपलं मौन सोडलं आहे.
सीबीआय सातत्याने सुशांतच्या मृत्यूचा तपास करतं आहे. सातत्याने उपस्थित केल्या जाणाऱ्या शंका, तपासावरून होणारे आरोप यावर आता सीबीआयने मात्र आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना सीबीआयने आपण कसून तपास करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. सुशांतचा मृत्यू ही हत्या होती, वा आत्महत्या होती यापैकी कोणत्याही एका निकषावर आम्ही अजून आलेलो नाही. कारण अद्याप तपास चालू आहे. आम्ही आमच्या वेगाने तपास करत असून योग्य वेळी आम्ही आमच्याकडे असलेली माहीती देऊ असं सीबीआयने सांगितलं आहे.
सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू 14 जूनला झाला होता. सुरुवातीला ती आत्महत्या वाटत असली तरी ती हत्या असल्याचा संशय बळावला. यावरच सीबीआयने तपास चालू केला होता. यासंदर्भात रिया चक्रवर्तीवरही संशयाची सुई रोखली गेली होती.
भारताचा आवाज अशी ओळख असलेल्या गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज वाढद....
अधिक वाचा