By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 08, 2020 06:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - चित्रपट सृष्टीत प्रदर्शित झालेल्या बर्याेच बायोपिकनंतर आता अजून एका नवीन बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे जीवन चरित्र बायोपिकच्या आधारे साकारण्यात येणार असून प्रेक्षकांच्या नजरे समोर रेखाटताना दिसणार आहे. या आगामी वर्षात पृथ्वीराज, मैदान, 83, सायना, सरदार उधम सिंह हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या यादीत आणखी एका नव्या चित्रपटाची भर पडली आहे.
In my humble opinion he was SAINT KALAM !i am so blessed and fortunate that I will be playing KALAM Saab in his biopic . https://t.co/0e8K3O6fMB
— Paresh Rawal (@SirPareshRawal) January 4, 2020
दरम्यान डॉ.अब्दुल कलाम यांच्या चरित्रावर आधारित असणारी भूमिका अभिनेता परेश रावल सकारणार आहे. याची माहिती अभिनेता परेश रावल यांनी ट्विट करत चाहत्यांना आशयातून सांगण्याचा प्रयत्न केला की, मी अब्दुल कलाम यांच्यावर बायोपिकामध्ये काम करणार आहे. त्यामुळे येत्या वर्षात अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असले तरी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा बायोपिक प्रेक्षकांसाठी अधिक प्रेरणादायी ठरेल असे दिसत आहे.
मुंबई - दीपिकाच्या ‘छपाक’ या आगामी सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार....
अधिक वाचा