By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 18, 2024 09:59 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
ऐश्वर्या रायच्या इंटिमेट सीनवर जया बच्चन यांनी व्यक्त केला संताप, म्हणाल्या, 'लाज नावाची गोष्ट राहिलेली नाही, सध्या फक्त आणि फक्त...', सर्वत्र जया बच्चन यांच्या वक्तव्याची चर्चा...
अभिनेत्री जया बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय कामय कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता देखील जया बच्चन त्यांच्या स्पष्ट आणि सडेतोड वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. सांगायचं झालं तर ‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमात अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत इंटिमेट सीन दिले होते. ज्यामुळे बच्चन कुटुंबात नाराजी होती. Jio MAMI 18 फिल्म फेस्टिवलमध्ये जया बच्चन याने सिनेमांमधील इंटिमेट सीनवर मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळ जया बच्चन चर्चेत आहेत.
आजच्या सिनेमांवर नाराजी व्यक्त करत जया बच्चन म्हणाल्या, ‘सध्या घडीला लोकं सिनेमे फक्त आणि फक्त पैशांसाठी करतात. लोकांना आता इंटिमेट सीन करताना लाज नावाची गोष्ट राहिलेली नाही. सिनेमाचं गांभीर्य आता नष्ट होत आहे… सर्वांसमोर प्रेमाचं प्रदर्शन करताना प्रत्येक जण दिसत आहे…’ पण यादरम्यान जया बच्चन यांनी ऐश्वर्या आणि ‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमाचं नाव घेतलं नाही. पण इंटिमेट सीन्सचा विरोध केला..
ऐश्वर्या राय आणि जया बच्चन
गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंबाबद्दल अनेक गोष्टींवरुन चर्चा सुरु आहे. जया बच्चन यांचं सून ऐश्वर्या राय हिच्यासोबत पटत नाही म्हणून… ऐश्वर्या हिने सासर सोडलं अशी देखील चर्चा रंगली होती. एवढंच नाही तर ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा घटस्फोट होणार असलेल्या चर्चांना देखील उधाण आलं होतं.. पण अभिषेक याने मुलाखातीच्या सर्व रंगणाऱ्या चर्चांना पूर्ण विराम दिला .
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्यण घेतला. 2007 मध्ये ऐश्वर्या – अभिषेक यांनी लग्न केलं. त्यानंतर 2011 मध्ये ऐश्वर्या हिने आराध्या बच्चन हिला जन्म दिला. सोशल मीडियावर देखील आराध्या हिचे आई – वडिलांसोबत अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमा
‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमात ऐश्वर्या हिच्यासोबत अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत होते. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. सिनेमातील गाणी आणि डायलॉग आज देखील चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. सिनेमात अभिनेता शाहरुख खान याने देखील पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.
ट्विंकलने आजवर बरीच पुस्तकं लिहिली आहेत. 'मिसेस फनीबोन्स', 'पजामास आर फर....
अधिक वाचा