ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महेश भट्ट यांनी फेकून मारली चप्पल,कंगणाच्या बहिणीचा खळबळजनक खुलासा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 18, 2019 10:54 AM 2019-02-12T14:15:30+5:30

महेश भट्ट यांनी फेकून मारली चप्पल,कंगणाच्या बहिणीचा खळबळजनक खुलासा

शहर : मुंबई

हिंदी सिनेसृष्टीत येण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रानौतला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. चक्क महेश भट्ट यांनी सुरुवातीच्या काळात खडतर प्रवासानंतर आज लोकप्रियतेच्या या शिखरावर पोहोचलेल्या कंगनाला चप्पल फेकून मारली असल्याचा खळबळजनक खुलासा कंगनाची बहिण रंगोलीने केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून आलियाला कंगनाने चांगलेच टोले लगवायला सुरूवात केली आहे. आपल्या मुलीच्या बाजूने याच पार्श्वभूमीवर बोलत आलियाची आई सोनी राजदान यांनी कंगनाला महेश भट्ट यांनीच चित्रपटसृष्टीत संधी दिली, तरीही ती सतत आमच्या कुटुंबीयांवर टीका का करते हेच समजत नसल्याचे म्हटले. कंगणाची बहिण रंगोलीने सोनी राजदान यांच्या या ट्विटवर उत्तर देत खळबळजनक खुलासा केला.

प्रिय सोनीजी, कंगनाला ब्रेक महेश भट्ट यांनी नव्हे तर अनुराग बासू यांनी दिला आहे. या चित्रपटात महेश भट्ट केवळ क्रिएटीव्ह डायरेक्टर म्हणून काम पाहत होते. त्याच बरोबर त्यांच्या 'धोखा' चित्रपटात काम करण्यास कंगनाने नकार दिल्यानंतर तिला संतापलेल्या महेश भट्ट यांनी बरेच काही सुनावले आणि महेश भट यांनी १९ वर्षांच्या कंगनाला 'लम्हे'च्या प्रिव्यूदरम्यान चप्पल फेकून मारली होती. कंगनाला तिचाच चित्रपट त्यांनी पाहू दिला नव्हता. यानंतर माझी बहीण रात्रभर रडली होती, असे रंगोलीने पुढे म्हटले आहे

 

मागे

संजय दत्त दिग्दर्शकाच्या भूमिकेत...
संजय दत्त दिग्दर्शकाच्या भूमिकेत...

द क्वीन ऑफ झांशी या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री कंगना रणौतने दिग्दर....

अधिक वाचा

पुढे  

सलमानसाठी नव्हे ‘या’ कारणासाठी केलं भारत चित्रपटामध्ये काम – कतरिना कैफ
सलमानसाठी नव्हे ‘या’ कारणासाठी केलं भारत चित्रपटामध्ये काम – कतरिना कैफ

प्रियंका चोप्रा सलमान खानच्या आगामी भारत या चित्रपटातून पुन्हा एकदा बॉलिव....

Read more