By PRATIMA LANDGE | प्रकाशित: एप्रिल 05, 2019 04:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कंगणा राणावत झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सिनेमातून चांगलीच चर्चेत आली. आता तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या बायोपिकमध्ये तीचा लीड रोल आहे. तमिळमध्ये “थलाइवी’ आणि हिंदीमध्ये “जया’ असे या सिनेमाचे नाव असणार आहे. जेंव्हापासून तिने आपल्या मानधनाचा आकडा जाहीर केला आणि चर्चेला उधाण आले आहे. आतापर्यंत गप्प बसलेल्या पब्लिकला बोलण्यासाठी निमित्तच मिळाले. कंगणावर वेगवेगळ्या कारणांनी जळणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. त्यामध्ये दिव्या दत्ता आणि रणवीर शौरे यांचीही आता भर पडली आहे. या दोघांना जेंव्हा कंगणाच्या मानधनाच्या रकमेबाबत समजले तेंव्हा दिव्या दत्ताला हसायलाच आले. तिने कसे तरी करून आपले हसू दाबण्याचा प्रयत्न केला आणि गंभीर मुद्रा करण्याचा प्रयत्न केला. पण तिला हसणे रोखता आले नाही. कंगणाला मिळणाऱ्या एवढ्या प्रचंड मानधनाबाबत बॉलीवूडमध्ये कोणीच उघडपणे बोलायला तयार नाही. कंगणाने मिळवलेले यश लोकांना खोटे वाटते आहे किंवा तिच्यासारख्या नटीला एवढे मानधन देणेच चुकीचे वाटत असावे. म्हणूनच एवढ्या मानधनाची चेष्टा केली जाते आहे.
न्यूयॉर्क : प्रसिद्ध गायिका ब्रिटनी स्पिअर्स ही सध्या मानसिक आजाराने त....
अधिक वाचा