By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 02, 2020 10:55 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
फरीदाबादमध्ये निकिता हत्याकांडाने सगळ्यांनाच हादरुन ठेवलं आहे. २६ ऑक्टोबर रोजी तौसीफ नावाच्या एका आरोपीने निकिताला गोळी मारली. हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. आरोपींना देखील पकडण्यात आलं आहे. असं म्हटलं जातंय की, आरोपीने निकिताला जीवे मारण्याचा प्लान हा मिर्झापूर सिरीज पाहण्यानंतर केला होता.
मिर्झापूरमध्ये मुन्ना भैय्या (दिव्येंदु शर्मा) एकतर्फी प्रेमामुळे स्वीटी (श्रेया पिळगांवकर) ला गोळी मारून तिची हत्या केली. सिरीजचा हा सीन आरोपी तौसीफ प्रेरीत झाला आणि त्याने निकिताची हत्या केली. तौसीफला देखील नितिकाशी लग्न करायचं होतं.
ही बातमी समोर येताच बॉलिवूडमधील कंगना राणौतचा राग अनावर झाला. अभिनेत्रीने एकदा पुन्हा बॉलिवूडवर प्रश्न उभे केले आहेत. कंगनाने बॉलिवूडवर पुन्हा एकदा ताशेरे ओढले आहेत. ट्विट करून कंगणाने याबाबतीत नाराजी व्यक्त केली आहे.
ट्विटरवर कंगनाने नाराजी व्यक्त केली आहे. कंगना म्हणते की, जेव्हा अपराध वाढतात तेव्हा असंच पाहायला मिळालं आहे. जेव्हा चांगले दिसणारे लोकं नकारात्मक भूमिका सादर करतात. धक्कादायक बाब ही आहे की, निगेटीव्ह कॅरेक्टर करणाऱ्या व्यक्तीची एन्ट्री अशी धमाकेदार केली जाते. बॉलिवूडला लाज वाटायला हवी की ते चांगलं सोडून नकारात्मक विचार पसरवत आहेत. कंगनाचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिर्झापूर या वेब सिरीजचा इतकं प्रेम मिळालं.
भक्तीच्या नावावर अपराधाला प्रोत्साहन देणाऱ्या 'आश्रम' या वेब सीरिजमध्य....
अधिक वाचा