By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 24, 2020 12:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भिवंडी शहरात सोमवारी (21 सप्टेंबर) तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेची तुलना अभिनेत्री कंगना रनौतने पुलवामा चकमकीशी केली आहे. पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानने मारले नव्हते तितकी निर्दोष लोक तुमच्या निष्काळजीपणामुळे मारले गेले, अशी टीका कंगनाने ट्विटरवरुन केली आहे.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, मुंबई महापालिका यांनी बेकायदेशीररित्या जेव्हा माझ्या घराचं तोडकाम करत होते, त्यावेळी त्यांनी या इमारतीवर लक्ष दिले असते तर आज जवळपास 50 लोक जिवंत असते. इतके सैनिक पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानने मारले नव्हते तितकी निर्दोष लोक तुमच्या निष्काळजीपणामुळे मारले गेले. मुंबईचं काय होणार हे देवाला माहिती…”असे ट्विट कंगना रनौतने केले आहे.
उद्धव ठाकरे, संजय राउत @mybmc जब मेरा घर ग़ैर क़ानूनी तरीक़े से तोड़ रहे थे, उस वक्त उतना ध्यान इस बिल्डिंग पे दिया होता तो आज यह लगभग पचास लोग जीवित होते, इतने जवान तो पुलवामा में पाकिस्तान में नहीं मरवाए जितने मासूमों को आपकी लापरवाही मार गयी, भगवान जाने क्या होगा मुंबई का
मागे
ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचं 84 व्या वर्षी निधन
ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. त्यांच....
अधिक वाचा