ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

काय वाकडं करायचंय ते करा; कंगनाचं शिवसेनाला जाहीर आव्हान

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 04, 2020 12:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

काय वाकडं करायचंय ते करा; कंगनाचं शिवसेनाला जाहीर आव्हान

शहर : मुंबई

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच, आहे असे ठणकावून सांगितल्यानंतर अभिनेत्री कंगना राणौत आणखीनच आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र हा तुमच्या बापाचा नाही. त्यामुळे तुम्हाला माझं काय वाकडं करायचंय ते करा, असे खुले आव्हानच कंगनाने शिवसेनेला दिले आहे. महाराष्ट्र हा कोणाच्याही बापाचा नाही. महाराष्ट्र हा मराठ्यांची मान अभिमानाने उंचावणाऱ्या लोकांचा आहे. मी निक्षून सांगते की, मी मराठा आहे. माझं काय वाकडं करायचंय ते करा, असे कंगनाने म्हटले आहे.

कंगनाने शुक्रवारी सकाळीही ट्विट करून शिवसेनेला डिवचले होते. अनेकांनी मला मुंबईत परत येण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आता मी येत्या आठवड्यात सप्टेंबर रोजी मुंबईत प्रवास करणार आहे. मुंबई विमानतळावर उतरण्याची वेळ मी तुम्हाला ठरली की सांगेन. कुणाच्या बापात हिंमत असेल तर मला रोखून दाखवा, असे कंगना राणौतने म्हटले होते.

कंगनाकडून सातत्याने सुरु असलेल्या या टीकेमुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी शिवसेना भवनासमोर कंगना महिला शिवसैनिकांनी कंगना राणौतचा पुतळा जाळून तिचा निषेध केला. तसेच येत्या तारखेला कंगनाला शिवसेना स्टाईल इंगा दाखवण्याचा चंग शिवसैनिकांनी बांधला आहे. त्यामुळे आता तारखेला काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

पुढे  

Sonu Sood | सोनू सूदचं स्तुत्य पाऊल, आता उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप देणार, इथं करा अर्ज
Sonu Sood | सोनू सूदचं स्तुत्य पाऊल, आता उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप देणार, इथं करा अर्ज

अभिनेता सोनू सूद कोरोना काळात आपल्या सामाजिक कामांमुळं चांगलाच प्रसिद्धी....

Read more