By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 17, 2020 01:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आपल्या अभिनयासाठी ओळखली जात नसून ती ‘सॉफ्ट पॉर्नस्टार’ असल्याची हीन भाषेतील टीका अभिनेत्री कंगना रनौत हिने केली आहे. कंगनाने तोंडसुख घेतल्यानंतर मनोरंजन विश्वातून उर्मिला मातोंडकर यांची पाठराखण केली जात आहे.
“उर्मिला मातोंडकर… ती सॉफ्ट पॉर्नस्टार आहे. मला माहित आहे की हे अत्यंत निंदनीय आहे. पण ती निश्चितच तिच्या अभिनयासाठी परिचित नाही. उर्मिला मातोंडकर कशासाठी ओळखली जाते? सॉफ्ट पॉर्नसाठी… बरोबर ना? जर तिला तिकीट मिळू शकतं, तर मला (तिकीट) का नाही मिळणार?” असं कंगना टाइम्स नाऊ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती. उर्मिला मातोंडकर यांनी संपूर्ण मुलाखतीत आपल्या संघर्षाचा अवमान केल्याचा दावाही कंगनाने केला.
उर्मिला मातोंडकर काय म्हणाल्या?
Maharashtra is cultural n intellectual face of India..land of Great Shivaji maharaj. Mumbai has fed millions of Indians n given them Name Fame n Glory.Only ungrateful can compare it with POK..Shocked n disgusted #EnoughIsEnough #आमचीमुंबई #mumbaimerijaan #जयमहाराष्ट्र ❤️
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) September 3, 2020
“संपूर्ण देश ड्रग्जच्या विळख्यात आहे. हिमाचल प्रदेश हे ड्रग्जचे उगमस्थान असल्याची तिला (कंगना) कल्पना आहे का? तिने स्वतःच्या राज्यातून सुरुवात केली पाहिजे” अशी टीका उर्मिला मातोंडकर यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत केली होती.
“क्या उखाड दोगे, किसके बाप का राज है, अशी भाषा कोणती सुसंस्कृत मुलगी वापरते? तिच्या ऑफिसवर झालेली कारवाई निंदनीयच आहे, त्याला माझा पाठिंबा नाही. पण तिला पुरवलेली वाय प्लस सुरक्षा आमच्याच पैशातून आहे. भाजपकडून निवडणुकीची उमेदवारी मिळवण्यासाठी ती त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे.” असा टोला उर्मिला मातोंडकर यांनी लगावला होता.
ड्रग्जचे सेवन करणाऱ्या बॉलिवूडमधील कलाकारांची नावे जाहीर करण्याची मागणी उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाकडे केली होती. “नावे कुठे आहेत? माझी इच्छा आहे की कंगनाने प्रत्यक्षात पुढे यावे आणि त्या सर्वांचे नाव घेऊन इंडस्ट्रीला मदत करावी. चला त्यांची सफाई करुया. मी तुला थंब्ज अप देणारी पहिली व्यक्ती असेन मुली” असेही त्या म्हणाल्या होत्या.याआधी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करण्यावरुनही उर्मिला यांनी कंगनाला चांगलंच सुनावलं होतं. “मुंबई लाखो भारतीयांचे पोट भरते आणि त्यांना नाव-प्रसिद्धी देते, केवळ कृतघ्नच तिची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करु शकतात” असे ट्वीट त्यांनी केले होते.
कंगनाच्या जहरी ट्वीटनंतर दिग्दर्शक अनुभव सिन्हा, अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी उर्मिला मातोंडकर यांना पाठिंबा दर्शवला आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्तानं ....
अधिक वाचा