By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 15, 2024 07:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
'आयुष्यातील इतकं मोठं सत्य...', करण जोहर याचं स्वतःच्या सेक्शुएलिटीवर लक्षवेधी वक्तव्य... चर्चांना उधाण, नुकताच झालेल्या मुलाखतीत करण जोहर याने केलं मोठं वक्तव्य
बॉलिवूडचा सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. करण कायम त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतो. आता देखील दिग्दर्शकाने स्वतःच्या सेक्शुएलिटीवर लक्षवेधी वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे करण याच्याबद्दल मोठं सत्य चाहत्यांना कळलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करण याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, करण याला त्याच्या सेक्शुएलिटीवरुन अनेकदा ट्रोल देखील करण्यात आलं. नुकताच झालेल्या मुलाखतीत करण म्हणाला, ‘माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या गोष्टीवर हेडलाईन्स’ बनाव्यात अशी माझी बिलकूल इच्छा नाही… माझ्या सेक्शुएलिटीवर लोकं हेटलाईन्स बनवतील असं मला वाटतं… मी कधीच माझी ओळख कोणापासून लपवली नाही..’
पुढे करण म्हणाला, ‘जमीनीवर राहून काम करणाऱ्या माणसांपैकी मी एक आहे. मला असं वाटतं, मला जे हवं होतं ते मी माझ्या सिनेमांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. माझं पुस्तक देखील अनेकांना आवडलं… अनेक जण त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांसोबत बोलू शकले आहेत..’
‘मला अनेक ई-मेल्स आणि पत्र आले आहेत… माझ्या सिनेमांच्या माध्यमातून अनेक जण त्यांच्या कुटुंबियांसोबत बोलू शकले आहेत… मला असं वाटतं आता सुरुवात झाली आहे आणि मी माझा प्रवास पुढे सुरु ठेवणार आहे… ‘
‘याठिकाणी जर मी कोणतं वक्तव्य केलं तर, सेंसेशनल होईल. लोकं माझ्याबद्दल अनेक वाईट गोष्टी लिहीतील. माझ्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी सिनेमा एक उत्तम मार्ग आहे…’ असं देखील करण म्हणाला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करण जोहर याची चर्चा रंगली आहे.
करण याच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्याने अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. 90 च्या दशकात कर करण याने अनेक एकापेक्षा एक सिनेमांचं दिग्दर्शन केलं आणि चाहत्यांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली. करण याचे काही सिनेमे आज देखील चाहते तितक्याच आवडीने पाहतात.
एवढंच नाही तर, अनेक नव्या कलाकारांना करण याने बॉलिवूडमध्ये संधी दिली. करण याची ओळख ‘बॉलिवूडचा गॉड फादर’ म्हणून देखील आहे. करण याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, करण याने सरोगसीच्या माध्यमातू जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. करण एक मुलगा आणि एक मुलीचा बाप आहे. करण कायम त्याच्या मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो.
राखी सावंत ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. राखी सावंत आणि वाद हे ....
अधिक वाचा