By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 18, 2019 10:54 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
प्रियंका चोप्रा सलमान खानच्या आगामी भारत या चित्रपटातून पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. मात्र ऐनवेळी प्रियंकाने या चित्रपटामध्ये काम करण्यास नकार दिल्यामुळे तिच्या जागी अभिनेत्री कतरिना कैफची वर्णी लागलीय. प्रियंकाच्या नकारामूळे कमी कालावधीमध्ये नव्या अभिनेत्रीचा शोध घेणं चित्रपटाच्या टीमला आव्हानासारखं होतं. त्यामुळे चित्रपटाच्या टीमने जॅकलीन फर्नांडिस आणि कतरिना कैफ या दोघींपैकी एकीची निवड करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार, चित्रपटासाठी कतरिनाची निवड करण्यात आली. परंतु सलमान खानमुळे कतरिनाची निवड झाल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे सलमाननेच कतरिनाला ही ऑफर दिल्याचं सांगण्यात येत होतं.
मात्र माझी निवड सलमानने केली नसून एका खास कारणासाठी मी या चित्रपटाला होकार दिला आहे असा खुलासा कतरिनाने केलाय. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत कतरिनाला प्रियांका चोप्राच्या जागी तिला कास्ट करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी चित्रपटामध्ये मला कास्ट करण्यामागे सलमानचा किंवा अली अब्बास जफरचा कोणताही संबंध नसल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. मी सलमान आणि अली अब्बास जफर तिघंही एकमेकांचे चांगले मित्र आहोत. मात्र कामाच्या बाबतीत आम्ही प्रामाणिकपणे वागतो. तिथे आमची मैत्री आड येत नाही. भारत या चिञपटाच्या बाबतीतही तेच झालं आहे. या चित्रपटाची स्क्रिप्ट मला आवडल्यामुळे मी चित्रपटासाठी होकार दिलाय असं कतरिना म्हणाली. मात्र माझ्या होकारामुळे किंवा मला हा चित्रपट मिळण्यामागे सलमान किंवा अली अब्बास जफरचा कोणताही हात नाही. इतकंच नाही तर मी चित्रपट साइन केल्यापासून ते ‘भारत’चं चित्रीकरण पूर्ण होईपर्यंत सलमानने मला एकदाही फोन केलेला नाही.
हिंदी सिनेसृष्टीत येण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रानौतला प्रचंड मेहन....
अधिक वाचा