By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 08, 2021 11:51 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मोस्ट अवेटेड सिनेमा 'केजीएफ चॅप्टर २' (KGF Chapter 2 Teaser) चा टीझर रिलीज झाला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे दिलेल्या वेळेच्या एक दिवस अगोदरच हा टीझर रिलीज झाला आहे. सुपरस्टार यशच्या वाढदिवसादिवशी सिनेमाचा टीझर लाँच करणार होते. मात्र त्यांनी एक दिवस अगोदर केलं आहे. या टीझरची चाहते मनापासून वाट पाहत आहेत. या टीझरला होमबेल फिल्म्सने यूट्यूबवर रिलीज केलं आहे. टीझर रिलाज होताच सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा रंगली आहे.
सिनेमाच्या टीझरची सुरूवात रॉकीची आई आणि त्याचं बालपण यापासून झाली आहे. रॉकीच्या आईने त्याला कसं सांभाळलं? रॉकी कसा मोठा झाला? आईला दिलेला शब्द तो कसा पाळतो? याने होते. रवीना टंडन यामध्ये एका खासदाराच्या भूमिकेत दिसत आहे. तर संजय दत्त अधीराच्या लूकमध्ये दिसत आहे. मात्र अजून संजय दत्तचा चेहरा दाखवलेला नाही.
यामध्ये यश जबरदस्त ऍक्शन करताना दिसत आहे. टीझरमध्ये गाड्यांचा एक शानदार अंदाज पाहायला मिळत आहे. यशचा स्वॅग, स्टाइल आणि त्याचा लूक अतिशय खतरनाक आहे.
सिनेमात दिसणार हे कलाकार
सिनेमात संजय दत्त (Sanjay Dutt), यश (Yash), रवीना टंडन (Raveena Tandon), श्रीनिधि शेट्टी, प्रकाश राजयांसोबत अनेक कलाकार दिसणार आहे. कन्नड सुपरस्टार यशबद्दल बोलायचं झालं तर त्याचा अनोखा स्वॅग आहे.
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही पती विराट कोहलीसोबत तिच्या फ्लॅटच्या ब....
अधिक वाचा