By NITIN MORE | प्रकाशित: डिसेंबर 26, 2019 06:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मराठी चित्रसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे ही आता बिग बॉस मराठी सीजन-२ नंतर हिन्दी वेबसिरीज मध्ये झळकताना दिसणार आहे. "चार्जशीट" या हिन्दी वेबसिरीजचा टीझर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला असून नव्या वर्षा दिवशी म्हणजेच १ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
वेबसिरीजच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांना नव्या वर्षामध्ये चांगलाच गिफ्ट देण्यात येणार आहे. गायत्री दिक्षित नामक स्त्रीची भूमिका साकारली आहे. या वेबसिरीजमध्ये किशोरी शहाणे ही पहिल्यांदाच ग्रे शेड भूमिका करताना प्रेक्षकांना दिसणार आहे.
चार्जशीट या वेबसिरिजमध्ये नव्या अभिनेत्याचाही समावेश असणार आहे, अरुणोदय सिंग, शिव पंडित, हृषीता भट्ट, सिकंदर खेर, त्रिधा चौधरी, अश्विनी काळसेकर, झाकीर हुसेन, किशोरी शहाणे आणि शक्ती आनंद त्यामुळे प्रेक्षकांची आतुरता शिगेला पोहचली आहे.
‘पद्मावत’नंतर आणखी एका सशक्त भूमिकेतून अभिनेत्री दीपिका प....
अधिक वाचा