By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 19, 2019 11:05 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : calcutta
सोमवारी सायंकाळी काम संपवून परतत असताना अभिनेत्री आणि मॉडेल उशोशी सेनगुप्ता हिच्याशी काही बाईकस्वारांनी गैरवर्तन केल्याची घटना घडली. कोलकाता येथे काही अनोळखी तरुणांनी तिच्याशी गैरवर्तन केलं. उबर कॅबमधून परतणाऱ्या उशोशीच्या कार चालकालाही या तरुणांकडून मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व प्रसंगाचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे. शिवाय खुद्द उशोशीनेही झालेल्या सर्व प्रसंगाची मांडणी तिच्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केली आहे.
२०१० मध्ये मिस युनिव्हर्स या सौंदर्यस्पर्धेत सहभागी झालेली उशोशी रात्री उशिरा एका पंचतारांकित हॉटेलमधून परतत होती. त्याचवेळी काही बाईकस्वार तिच्या कारपाशी (उबर कॅबपाशी) येऊन आदळले आणि त्यांनी उबर चालकाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
फेसबुक पोस्टमध्ये नमूद केल्यानुसार त्यावेळी उशोशीनेही आवाज चढवत मोठ्या धीराने त्या प्रसंगाचं चित्रण करत पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. पण, संबंधित परिसर हा आपल्या हद्दीत येत नसल्याचं सांगत नजीकच्या पोलीस चौकीतील अधिकाऱ्यांनी तिची मदत करण्यास आडेवेढे घेतले.
खुद्द उशोशीनेच तिच्या पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे. त्यानंतर जेव्हा पोलीस घटनास्थळी आले तेव्हा ते सर्व बाईकस्वार तरुण तिथून पळ काढत निघून गेले. जवळपास सहा तरुणांनी उशोशीचा पाठलाग केला. त्यावेळी तिच्यासोबत एका सहकाऱ्याचीही उपस्थिती होती. संबंधित तरुणांनी आपला फोन फोडण्याचा प्रयत्न केला शिवाय चित्रीत केलेला व्हिडिओही डिलीट करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात आल्याचं उशोशीने स्पष्ट केलं. दरम्यान, उशोशीसोबत घडलेल्या प्रसंगाची ही पोस्ट व्हायरल होताच त्यावर कोलकाता पोलिसांनी तातडीने कारवाई केल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आली. या प्रकरणी त्यांनी सातजणांना अटक करण्यात आली आहे. शिवाय एफआयआर दाखल करण्यास दिरंगाई झाल्याच्या घटनेच्या तपासणीचेही आदेश कोलकाता पोलीस अधिक्षकांकडून देण्यात आल्याचं कळत आहे.
'तुझ माझं ब्रेक अप' फेम अभिनेत्री केतकी चितळेला काही दिवसांपूर्वी नेटकऱ्....
अधिक वाचा