ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

क्षितीची कसरत सेलिब्रिटी पद राखण्यासाठी...

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 14, 2019 04:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30

क्षितीची कसरत सेलिब्रिटी पद राखण्यासाठी...

शहर : मुंबई

मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची सर्वसामान्यांच्या मनात कायमच कुतूहल असतं. तर, सध्याच्या काळात हे कुतूहल शमवण्याचं काम वेगवेगळी समाजमाध्यमं आणि स्वतः सेलिब्रिटी सातत्यानं करत असतात. मात्र या साऱ्याला काही कलाकार मात्र अपवाद असतात. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे क्षिती जोग आहे. क्षितीचा तसा सोशल मीडियावर फारसा वावर नसला तरी तिच्या चाहत्यांची संख्या अफाट आहे. त्यामुळे तिचं प्रत्येक नाटक पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करत असतात. तिच्या याच लोकप्रियतेमुळे सध्या तिची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. क्षितीचं नॉक! नॉक! सेलिब्रिटी हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून नाटकाचे प्रयोग करण्यासाठी क्षितीची प्रचंड धावपळ होत आहे. ओंकार अरविंद कुळकर्णी लिखित आणि मंदार देशपांडे दिग्दर्शित नॉक! नॉक! सेलिब्रिटी या नव्या नाटकामध्ये क्षिती आणि सुमीत राघवन हे दोनच कलाकार असून नाटकाचा संपूर्ण डोलारा त्या दोघांवरच आहे. एकावेळी एकच कलाकार स्टेजवर सलग वावरत असल्याने त्याची दमछाक तर होणारच! त्यात क्षितीने आधी घेतलेल्या टीव्ही आणि चित्रपटांमुळे तिची खरीखुरी कसरत नॉक! नॉक! सेलिब्रिटीसाठी होताना दिसतेय.

मागे

बॉलिवूडच्या या सहा चित्रपटांची चीनच्या प्रेक्षकांना भुरळ
बॉलिवूडच्या या सहा चित्रपटांची चीनच्या प्रेक्षकांना भुरळ

२०१८ मध्ये प्रदर्शित झालेला अंधाधून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई ....

अधिक वाचा

पुढे  

लोकसभा निवडणूक आणि आयपीएलचा  प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांना मोठा फटका
लोकसभा निवडणूक आणि आयपीएलचा प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांना मोठा फटका

लोकसभा निवडणूकांची सुरूवात ११ एप्रिलपासून झाली आहे. सर्वत्र निवडणूकींच्य....

Read more