By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 04, 2020 11:43 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अभिनेता सुशांतसिंह आत्यहत्येनंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (NCB) प्रकरणाची कसून चौकशी होत आहे. सध्या एनसीबी बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन संबंधी अनेकांची चौकशी करत आहे. दरम्यान ड्रग्स प्रकरणी धर्मा प्रोडक्शनचे डायरेक्टर क्षितिज प्रसादला अटक करण्यात आली आहे. दरम्यान आपल्यावर बड्या कलाकारांची नावे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याची कबुली क्षितिज प्रसादने दिली आहे.
बॉलिवूड ड्रग्स प्रकरणी डीनो मोरिया, अर्जुन रामपाल (Arjun Rampal) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांची नावे घेण्यासाठी एनसीबी दबाव टाकत असल्याची कबुली क्षितिज प्रसादने दिली आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील अनेक रहस्य समोर येत आहेत.
२५ सप्टेंबरला शुक्रवारी त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर ड्रग्स प्रकरणी २६ सप्टेंबरला क्षितिजला अटक करण्यात आली. कोर्टाने क्षितीजला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे, तर या प्रकरणी इतर २० जणांना देखील ताब्यात घेतले आहे. . क्षितिजच्या घरात एनसीबीनं छापेमारी केली होती. यात त्याच्या घरात गांजा आढळला होता.
तीन महिन्यात १ डझन गांजा खरेदी केल्याची कबुली त्याने दिली आहे. ५० ग्रॉम गांजा खरेदी करण्यासाठी तो ३ हजार ५०० रूपये मोजत होता. क्षितिजच्या घरात एनसीबीनं छापेमारी केली होती.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली नसून हे आत्महत्येचं प्रकरण आहे, अस....
अधिक वाचा