ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लक्ष्मीकांत बेर्डेच्या मुलीचा बोल्ड अंदाज,लवकरच मराठी सिनेसृष्टीत करणार पदार्पण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 04, 2019 03:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

लक्ष्मीकांत बेर्डेच्या मुलीचा बोल्ड अंदाज,लवकरच मराठी सिनेसृष्टीत करणार पदार्पण

शहर : मुंबई

लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नावं. मराठी सोबतच बॉलिवूडमध्येही आपला वेगळा ठसा उमटवणारा हा दिग्गज कलाकार. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या अभिनयाने सगळ्यांना निखळ आनंद दिला. त्यांच्या जाण्यानंतरही ते सिनेमातून अजरामर आहेत.

लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सिनेमे आजही आपलं मनोरंजन करत आहेतच. पण आता त्यांचा मुलगा अभिनय बेर्डे देखील अभिनयात उतरला आहे. त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना पुन्हा एकदा लक्ष्मीकांत यांची आठवण करून दिली. आता या पाठोपाठ लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे देखील सिनेसृष्टीत पदार्पण करेल अशी चिन्ह आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Swanandi L Berde (@swanandiberde) on

स्वानंदीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बोल्ड अंदाजातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा स्कर्ट टॉपमध्ये दिसत आहे. या फोटोत तिचा अतिशय ग्लॅमरस लूक दिसत आहे. तिच्या या फोटोंवर खूप कमेंट आणि लाईक्स मिळत आहेडॅनिअल वेलिंगटन Danielwellington या घड्याळ्याचची जाहिरात स्वानंदी करताना दिसत आहे.

स्वानंदीने आपल्या इंस्टाग्रामवर या आऊटफिटचे तीन फोटो शेअर केले आहेत. पण तिचं हे अकाऊंटच खास आहे. यावर स्वानंदीचे अतिशय सुंदर असे फोटो आहेत.

स्वानंदी आपल्या आई-वडिलांप्रमाणे चाहत्यांना भरपूर आनंद देईल यात शंका नाही. स्वानंदी 'रिस्पेक्ट' या सिनेमातून पदार्पण करणार आहे. तसेच किशोर बेळेकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

मागे

व्हिडिओ : घागरा न घालताच सेटवर पोहोचली अभिनेत्री
व्हिडिओ : घागरा न घालताच सेटवर पोहोचली अभिनेत्री

अभिनेत्री एरिका फर्नांडिसचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.  एकत....

अधिक वाचा

पुढे  

नाट्यगृह आता 'रिंगटोनमुक्त', मोबाईल जॅमर बसवण्याचा निर्णय
नाट्यगृह आता 'रिंगटोनमुक्त', मोबाईल जॅमर बसवण्याचा निर्णय

नाट्यगृहामध्ये मोबाईल सायलेंटवर ठेवण्याची सूचना वारंवार करुनही काही हेके....

Read more