ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

WWE मध्ये चक्क अक्षतांऐवजी पडले बुक्के

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 02, 2020 03:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30

WWE मध्ये चक्क अक्षतांऐवजी पडले बुक्के

शहर : विदेश

           WWE हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय स्पोर्ट्स एन्टरटेन्मेंट शोंपैकी एक म्हणून ओळखला जातो. या शोमध्ये आश्चर्यचकित करणारी फाईटिंग तर पाहायला मिळतेच. परंतु त्याचबरोबर काही आवाक् करणारे गमतीशीर प्रसंगही पाहायला मिळतात. अलिकडेच असाच एक गमतीशीर प्रसंग WWE मध्ये घडला. फाईटिंग रिंगमध्ये लग्न सुरु असताना नवरी मुलीचा पहिला पती चक्क केकमधून बाहेर आला.


         WWE सुपरस्टार बॉबी लेस्ली व लाना हे दोघे लग्न करणार होते. आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन आहे. परंतु यातील गमतीशीर बाब म्हणजे त्यांनी चर्चऐवजी चक्क WWE फाईटिंग रिंगमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे लग्न सोहळ्याची तयारी केली गेली.

 

          अखेर लग्नाचा दिवस उजाडला. रिंगमध्ये होणारे हे अनोखे लग्न पाहाण्यासाठी स्टेडिअममधील सर्व प्रेक्षक आतुर झाले होते. रिंगमध्ये नवरा-नवरीचे आगमन झाले. त्यांच्यासोबत लग्न लाऊन देणारे ख्रिस्ती धर्मगुरु यांचेही आगमन झाले. त्यानंतर धर्मगुरुंनी लग्न लाऊन देण्यासाठी मंत्र पुटपुटण्यास सुरुवात केली. हे लग्न सुरु असतानाच बॉबी लेस्लीची पहिली पत्नी लिव मॉर्गन लानाला मारण्यासाठी रिंगमध्ये धावत आली. 


         त्यानंतर दोघांमध्ये तुंबळ लढाई झाली. दरम्यान त्यांची लढाई सुरु असतानाच लानाचा पहिला पती रुसेव केकमधून बाहेर आला आणि त्याने बॉबी लेस्लीवर जोरदार हल्ला केला. अखेर लिव मॉर्गन आणि रुसेव या दोघांनी मिळून आपल्या पहिल्या जोडिदाराच्या लग्नात अक्षरश: धुमाकूळ घातला. हा अनपेक्षित प्रकार पाहून उपस्थित प्रेक्षकांनी एकच हास्यकल्लोळ केला.


 

मागे

‘द बिग बुल’ अभिषेक बच्चन ? आगामी चित्रपटाचे पोस्टर आऊट...
‘द बिग बुल’ अभिषेक बच्चन ? आगामी चित्रपटाचे पोस्टर आऊट...

         अभिनेता अभिषेक बच्चन सध्या बर्‍याच काळापासून मोठ्या पडद्....

अधिक वाचा

पुढे  

नीना गुप्तांच्या चित्रपटाला ऑस्कर मानांकन
नीना गुप्तांच्या चित्रपटाला ऑस्कर मानांकन

         मुंबई - अभिनेत्री नीना गुप्ता या त्यांच्या व्यक्तीमत्वामुळे आ....

Read more