By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 17, 2020 01:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्रातील पहिल्या महिला लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी कंगना रनौत-उर्मिला मातोंडकर वादावर भाष्य केले आहे. कंगनाचा धिक्कार करत उर्मिला यांचा अभिमान वाटल्याची भावना डॉ. माधुरी कानिटकर यांनी व्यक्त केली आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ‘सॉफ्ट पॉर्न’साठी परिचित असल्याची बोचरी टीका कंगना रनौत हिने केली होती.
“लज्जास्पद आहे कंगना रनौत. मी सहसा कुणावर कधीच भाष्य करत नाही. पण एक स्त्री म्हणून हे मला खूप त्रास देणारे आहे” असे लिहित “आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे उर्मिला मातोंडकरजी” असे डॉ. माधुरी कानिटकर यांनी ट्विटरवर कंगनाचा व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे.
Shame on you @KanganaTeam
— DR.Madhuri Kanitkar (@MadhuriKanitkar) September 17, 2020
I never comment on anyone like that. But as a woman it is going to hurt me a lot.
आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे @UrmilaMatondkar जी ❤ https://t.co/3sxOlzMqpE
कंगनाच्या व्हिडीओमध्ये काय?
“मी आज उर्मिला मातोंडकर यांची एक मुलाखत पाहिली. त्या संपूर्ण मुलाखतीत माझी खिल्ली उडवत होत्या. माझ्या संघर्षावरुन मला चिडवत होत्या. मी तिकीट मिळवण्यासाठी भाजपला खुश करण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्या म्हणाल्या. पण मला तिकीट मिळवण्यासाठी स्वतःच्या आयुष्याशी खेळ करण्याची गरज नाही, हे सांगण्यासाठी कोणी हुशार असायची गरज नाही. उर्मिला मातोंडकर… ती एक सॉफ्ट पॉर्नस्टार आहे. मला माहित आहे की हे अत्यंत निंदनीय आहे. पण ती निश्चितच तिच्या अभिनयासाठी परिचित नाही. उर्मिला मातोंडकर कशासाठी ओळखली जाते? सॉफ्ट पॉर्नसाठी… बरोबर ना? जर तिला तिकीट मिळू शकतं, तर मला (तिकीट) का नाही मिळणार?”
कोण आहेत डॉ. माधुरी कानिटकर?
डॉ. माधुरी कानिटकर या भारतीय लष्करातील डॉक्टर असून 29 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांची लेफ्टनंट जनरल या पदावर नियुक्ती झाली. या पदावर काम करणाऱ्या त्या देशातील तिसऱ्या, तर महाराष्ट्रातील पहिल्या महिला आहेत.त्यांनी नवी दिल्ली येथील एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (सीडीएस- वैद्यकीय) म्हणून पदभार स्वीकारला.
उर्मिला मातोंडकर काय म्हणाल्या होत्या?
“संपूर्ण देश ड्रग्जच्या विळख्यात आहे. हिमाचल प्रदेश हे ड्रग्जचे उगमस्थान असल्याची तिला (कंगना) कल्पना आहे का? तिने स्वतःच्या राज्यातून सुरुवात केली पाहिजे” अशी टीका उर्मिला मातोंडकर यांनी त्याआधी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत केली होती.
“क्या उखाड दोगे, किसके बाप का राज है, अशी भाषा कोणती सुसंस्कृत मुलगी वापरते? तिच्या ऑफिसवर झालेली कारवाई निंदनीयच आहे, त्याला माझा पाठिंबा नाही. पण तिला पुरवलेली वाय प्लस सुरक्षा आमच्याच पैशातून आहे. भाजपकडून निवडणुकीची उमेदवारी मिळवण्यासाठी ती त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे.” असा टोला उर्मिला मातोंडकर यांनी लगावला होता.
ड्रग्जचे सेवन करणाऱ्या बॉलिवूडमधील कलाकारांची नावे जाहीर करण्याची मागणी उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाकडे केली होती. “नावे कुठे आहेत? माझी इच्छा आहे की कंगनाने प्रत्यक्षात पुढे यावे आणि त्या सर्वांचे नाव घेऊन इंडस्ट्रीला मदत करावी. चला त्यांची सफाई करुया. मी तुला थंब्ज अप देणारी पहिली व्यक्ती असेन मुली” असेही त्या म्हणाल्या होत्या.याआधी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करण्यावरुनही उर्मिला यांनी कंगनाला चांगलंच सुनावलं होतं. “मुंबई लाखो भारतीयांचे पोट भरते आणि त्यांना नाव-प्रसिद्धी देते, केवळ कृतघ्नच तिची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करु शकतात” असे ट्वीट त्यांनी केले होते.
कंगनाचे उत्तर
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ‘सॉफ्ट पॉर्न’साठी परिचित असल्याची बोचरी टीका केल्यानंतर कंगना रनौत हिने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला “सनी लिओनसारख्या व्यक्ती आमच्या रोल मॉडेल नसाव्यात, असे म्हणणाऱ्या नामांकित लेखकावर लिबरल ब्रिगेड सोशल मीडियावरुन तुटून पडली होती. सनीला इंडस्ट्री आणि संपूर्ण भारताने एक कलाकार म्हणून स्वीकारले आहे. अचानक बनावट फेमिनिस्ट्सनी (स्त्रीवादी) पॉर्न स्टारला आक्षेपार्ह मानले आहे” असे ट्वीट कंगनाने केले आहे.
प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आपल्या अभिनयासाठी ओळखली जात नसून ती &lsq....
अधिक वाचा