ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 30, 2024 05:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

शहर : मुंबई

ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले आहे.

ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले आहे. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले, असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करताना म्हटले आहे.

अशोक सराफ यांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी त्यांना हा मोलाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आयत्या घरात घरोबा, एक डाव भुताचा, वजीर, भस्म्या, खरा वारसदार, धुमधडाका, गंमतजंमत, अशी ही बनवाबनवी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. हम पाच या मालिकेत त्यांनी साकारलेला आनंद माथुर तर आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. अशोक सराफ यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्येदेखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या ते शेंटिमेंटल या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकत आहेत.

बँकेची नोकरी ते सिनेमा

चित्रपटसृष्टीत येण्याआधी ते एका सरकारी बँकेत काम करत होते. त्यांनी चित्रपटात काम करायला सुरुवात केल्यानंतरही काही वर्षं बँकेत काम केले. 1974ला त्यांनी पहिला चित्रपट केला. आजही ते काम करतच आहेत. मराठी रंगभूमीसह मराठी आणि हिंदी सिनेमातील अतुलनीय योगदानाबद्दल अशोक सराफ यांना हा राज्याचा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला आहे.

गाजलेले सिनेमे

गोंधळात गोंधळ, राम राम गंगाराम, गोष्ट धमाल नाम्याची आणि सुना येती घरा या सिनेमातील भूमिकांसाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे. तर पांडू हवालदार सिनेमातील भूमिकेसाठी त्यांना राज्य सरकारच्या पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. सवाई हवालदार या सिनेमातील भूमिकेसाठी त्यांना स्क्रीन अॅवार्ड मिळालेला आहे. तर मायका बिटुआ या सिनेमातील कामाबद्दल त्यांना भोजपुरी फिल्म पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे.

नाटकंही गाजली

लगीन घाई, सारखं छातीत दुखतंय, प्रेमा तुझा रंग कसा? मनोमिलन, झालं एकदाचं, व्हॅक्यूम क्लिनर, हमीदाबाईची कोठी, संगीत संशय कल्लोळ, हसतखेळत आदी नाटकातील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या आहेत.

 

मागे

ऑस्कर 2024 साठी नामांकित चित्रपटांची यादी अखेर जाहीर, वाचा संपूर्ण यादी, बार्बीपासून ते…
ऑस्कर 2024 साठी नामांकित चित्रपटांची यादी अखेर जाहीर, वाचा संपूर्ण यादी, बार्बीपासून ते…

ऑस्कर 2024 ची प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. गेल्या काबी दिवसां....

अधिक वाचा